
बेळगाव | Belgoan
महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद पेटला असून बेळगावमधील हिरबागेवाडी टोलनाक्यावर महाराष्ट्राच्या वाहनांवर हल्ला करण्यात आला आहे. कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांकडून हल्ला करण्यात आला आहे.
बेळगावात महाराष्ट्राच्या १० वाहनावर हल्ला करण्यात आलाय. कन्नड रक्षण वेदिका महाराष्ट्रविरोधात आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय. त्यामुळे महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद पेटण्याची शक्यता आहे.