करोनामुक्त गावांमध्ये शाळा सुरु करण्यासाठी मार्गदर्शक सूचना जारी

करोनामुक्त गावांमध्ये शाळा सुरु करण्यासाठी मार्गदर्शक सूचना जारी
संग्रहित

मुंबई / Mumbai - करोनामुक्त गावांमध्ये बंद असलेल्या शाळा (schools) पुन्हा सुरु करण्यात येणार आहेत. करोनामुक्त भागात आठवी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय काही दिवसांपूर्वी घेण्यात आला आहे.

आता करोनामुक्त गावांमध्ये (corona free villages) येत्या 15 तारखेपासून इ. 8 वी ते 12 वी चे वर्ग सुरु करण्यासाठी शालेय शिक्षण विभागाने मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत.

याबरोबरच इतर वर्ग सुरु करण्याबाबतही अनेक पालक, शिक्षक वारंवार विचारणा करत आहेत. त्यामुळे, शालेय शिक्षण विभागानं राज्यातल्या सर्व पालक, शिक्षकांकडून शाळा सुरु करण्याबाबत सर्वेक्षण हाती घेतले आहे. हे सर्वेक्षण उद्या रात्री 11 वाजून 55 मिनिटांपर्यंत सुरु राहणार आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com