
नांदेड | Nanded
पुरोगामी महाराष्ट्राला हादरवणारा प्रकार नांदेडमध्ये उघडकीस आला आहे. खोट्या प्रतिष्ठेसाठी आई-वडिल, भाऊ आणि मामाने पोटच्या लेकीची निर्घृण हत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. (Nanded Honor Killing)
पाचही आरोपी हे मुलीची हत्या करुन थांबले नाही तर त्यांनी तिचा मृतदेह देखील जाळून टाकला. अवघ्या काही दिवसात तरुणी ही डॉक्टर होणार होती मात्र फक्त एका गोष्टीमुळे तिच्या कुटुंबीयांनीच तिचा निर्घृणपणे जीव घेतला. (Nanded Murder Case)
ही घटना नांदेड जिल्ह्यातील लिंबगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पिंपरी माहिपाल गावात घडली आहे. शुभांगी जोगदंड (वय २३) (Dr Shubhangi Case) असे मृत तरुणीचे नाव असून ती बीएचएमएसच्या तिसऱ्या वर्षांत शिकत होती. शुभांगीचे गावातीलच एक तरुणावर प्रेम होते. मात्र त्यांच्या प्रेमाला घरातून विरोध होता. (Crime news)
कुटूंबाने तिचे दुसरीकडे लग्न जुळवले मात्र तिने ठरलेलं लग्न मोडलं होतं. लग्न मोडल्यामुळे गावात आपली बदनामी झाली, या रागातून आरोपी वडील जनार्दन जोगदंड, भाऊ केशव जोगदंड, मामा गिरधारी जोगदंड, कृष्णा आणि गोविंद या दोन चुलत भावांनी मुलीला ठार मारलं.
एका निनावी फोनमुळे त्यांचे बिंग फुटले
शुभांगीच्या प्रेमसंबंधांवरुन जोगदंड कुटुंबीयांमध्ये तणाव असल्याची माहिती गावकऱ्यांना होती. रोज दिसणारी शुभांगी सोमवारी शेजारपाजारच्या लोकांना दिसली नाही, तेव्हाच अनेकांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. शुभांगी कुठे गायब झाली, याविषयी गावात दबक्या आवाजात कुजबुज सुरु झाली. अशातच एका खबऱ्याने पोलिसांना फोन करुन शुभांगीचा खून झाल्याची धक्कादायक माहिती सांगितली.
यानंतर पोलिसांनी वेगाने हालचाली करत सर्वांना ताब्यात घ्यायला सुरुवात केली. पोलिसांनी शुभांगीचे वडील जनार्दन लिंबाजी जोगदंड, भाऊ कृष्णा जोगदंड, चुलत भाऊ गिरीधारी शेषराव जोगदंड, गोविंद केशवराव जोगदंड आणि मामा केशव शिवाजी कदम यांना अटक केली. सध्या पोलिसांकडून या सगळ्यांची कसून चौकशी सुरु असून गुन्ह्याचा माग काढण्याचा प्रयत्न केला जात आहे.