मुंबई -

केंद्र सरकार करोनाला प्रतिबंध करणार्या लसीबाबत मायक्रो प्लॅनिंग करत आहे. लसीकरणाची कार्यपद्धती ठरवण्यात आली असून त्यानूसार एसएमएसद्वारे लसीकरणाची तारीख, वेळ आणि ठिकाण कळविण्यात येणार आहे.

ज्या तारखेला लस द्यायची आहे त्याबाबतचा मेसेज संबंधित व्यक्तीला पाठवला जाईल. मेसेज प्राप्त झाल्यावर संबंधित ठिकाणी ओळखपत्रासह जावं लागणार आहे. ती व्यक्ती आल्यावर ओळख पटवली जाईल. त्यानंतर त्याला लस देण्यात येईल अशी माहिती महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

लसीकरणाबाबत केंद्र सरकार माहिती मागवत आहे. हेल्थ वर्कर्स, अत्यावशक सेवेतील कर्मचारी, 50 वर्षांवरील नागरिक शिवाय इतर आजार असलेले 50 वर्षांवरील नागरिक यांची माहिती गोळा केली जाते आहे असंही आरोग्य मंत्री टोपे यांनी स्पष्ट केलं.

18 हजार लोकांना ट्रेनिंग द्यायचं काम आता पूर्ण होईल. स्टोरेजसाठी कोल्डचेन व्यवस्था झाली आहे. लस देण्यासाठी कार्यपद्धती आहे. ज्या तारखेला लस द्यायची आहे त्यासंबंधीचा मेसेज संबंधित व्यक्तीला येईल तो येणार, त्याची ओळख पटल्यावर त्याला लस देणार अशा प्रकारचं मायक्रो प्लॅनिंग सुरु असल्याचं टोपे यांनी सांगितलं.

करोनाचा प्रतिबंध करणारी लस केंद्र सरकार पुरवेल अशी आम्हाला खात्री आहे. जी कामं राज्य सरकारने करायची आहेत ती आम्ही करतो आहोत. लॉजिस्टिक, डेटा या सगळ्याची कामं सुरु आहेत. लसीकरणाच्या परिमाणाबाबत एक युनिट तयार करण्यात आलं आहे. सीरम आणि भारत बायोटेक यांनी लसीकरणाबाबत केंद्र सरकारकडे परवानगी मागितली आहे. आता निर्णय केंद्राला करायचा आहे असंही राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं.

मतदानाप्रमाणे बुथ

लसीकरणासाठी राज्य सरकारची तयारी पूर्ण होत आली आहे. 18 हजार कर्मचार्यांना त्यासाठी प्रशिक्षण देण्यात येत असून ते अंतिम टप्प्यात आहे. ज्याप्रमाणे मतदानासाठी बुथ उभारले जातात त्याचप्रमाणे कोरोनावरील लस देण्यासाठी बुथ उभारले जाणार आहेत. आपले कर्मचारी लसीकरणासाठी सज्ज आहेत, असे टोपे यांनी नमूद केले.