मोठी बातमी! राज्यात मोफत लसीकरण होणार

ठाकरे सरकारची मोठी घोषणा
मोठी बातमी! राज्यात मोफत लसीकरण होणार

मुंबई | Mumbai

देशात १ मेपासून लसीकरणाच्या तिसऱ्या आणि मोठ्या टप्प्याला सुरुवात होणार आहे. या तिसऱ्या टप्प्यामध्ये १८ वर्षावरील सर्वांना कोरोना लस दिली जाणार आहे.

या पार्श्वभूमीवर राज्याचे अल्पसंख्यांक आणि कौशल्य विकासमंत्री नवाब मलिक यांनी लसीकरणाबाबत महत्वाची माहिती दिली आहे.

नवाब मलिक यांनी म्हंटल आहे की, 'महाराष्ट्र सरकारतर्फे राज्यातील १८ वयोगटावरील प्रत्येकाचं मोफत लसीकरण करण्यात येईल. सरकार आपल्या तिजोरीतून हा कार्यक्रम हाती घेईल.' तसेच, 'जागतिक टेंडर मागवण्यात येणार असून जास्तीत जास्त लस खरेदी करण्यात येणार आहे,' असंही ते म्हणाले.

कोव्हिशिल्ड, कोव्हॅक्सिन या लशींचे सर्व उत्पादन भारतासाठी वापरले, तरी भारताची लोकसंख्या पाहता लस कमी पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे या भारतीय लशींबरोबरच परदेशातील विविध कं पन्यांची लस खरेदी करण्यासाठी केंद्र सरकार परवानगी देईल. त्यामुळे कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या लशींच्या जेवढ्या कु प्या उपलब्ध होतील, तेवढ्या घेतल्या जाणार आहेत. मात्र, परदेशी लस खरेदीचा अधिकार दिल्यानंतर त्या तातडीने उपलब्ध होण्यासाठी जागतिक निविदा काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

देशात याआधी दोन टप्प्यात लसीकरण मोहिम झाली. १६ जानेवारी २०२१ रोजी पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचारी आणि करोना योद्ध्याना लशीचे डोस देण्यात आले होते. दुसऱ्या टप्प्यात ४५ वर्षांवरील सर्वांना लस देण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

Title Name
१ मेपासून १८ वर्षांवरील सर्वांना करोना लस; कधी व कुठे कराल नोंदणी?
मोठी बातमी! राज्यात मोफत लसीकरण होणार

आता तिसऱ्या टप्प्यात १८ वर्षांवरील सर्वांना लस देण्यात येणार आहे. भारतामध्ये सध्या तीन लसी दिल्या जात आहे. यामध्ये सीरम इन्सिट्युटची 'कोविशील्ड' तर भारत बायोटेकच्या 'कोव्हॅक्सीन'चा समावेश आहे. याशिवाय रशीयाची 'स्पूतनिक' ही लसही उपलब्ध आहे.

सीरम इन्स्टिट्यूटची कोविशील्ड लस राज्य सरकाच्या रुग्णालयात ४०० रुपये प्रति डोस किंमतीमध्ये उपलब्ध असणार आहे. तर भारत बायोटेकची कोव्हॅक्सिनची किंमत ६०० रुपये असणार आहे. कोविशील्डची खासगी रुग्णालयातील किंमत ६०० रुपये असेल तर कोव्हॅक्सिन १२०० रुपयांना मिळणार आहे.

एक मे रोजी लसीकरणाला सुरुवात होणार असून १७ राज्यांनी मोफत लस देण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये मध्य प्रदेश, जम्मू, काश्मीर, हिमाचल प्रदेश, गोवा, केरळ, छत्तीसगढ, बिहार, झारखंड, उत्तर प्रदेश, आसाम, सिक्कीम, पश्चिम बंगाल, तामिळनाडू, आंध्रप्रदेश, तेलंगना, हरियाणा या राज्यांचा समावेश आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com