मोठी बातमी! मराठा समाजाला दिलासा, तरुणांना EWS आरक्षण मिळणार
मराठा आरक्षण

मोठी बातमी! मराठा समाजाला दिलासा, तरुणांना EWS आरक्षण मिळणार

मुंबई | Mumbai

सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाचा कायदा रद्द केल्यानंतर मराठा समाजातील काही संघटना तसेच राजकीय नेत्यांनी पुढे येत महाराष्ट्र सरकारवर टीकेची झोड उठवली होती. मराठा समाजाला दिलासा देण्यासाठी आता ठाकरे सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.

राज्यातील मराठा विद्यार्थी आणि उमेदवारांना १० टक्के EWS आरक्षणाचा लाभ देण्याचा निर्णय ठाकरे सरकारने घेतला आहे. शैक्षणिक संस्थांमधील प्रवेशात मिळणार १०% आरक्षणाचा लाभ मिळणार आहे. त्याबरोबर सरळ सेवा भरतीत ही मराठा उमेदवार आरक्षणाचा १०% लाभ घेऊ शकतात. राज्य सरकारनं शासन निर्णय जारी केला आहे.

सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर मराठा समाजाला दिलासा देण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न आहे. राज्यात मराठा आरक्षण लागू असताना मराठा समाजाला १० टक्के EWS आरक्षणाचा फायदा घेता येत नव्हता, तसा निर्णय सरकारने घेतला होता. आता मात्र मराठा आरक्षण रद्द झाल्यावर मराठा समाजाला EWS आरक्षण लाभ देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.

EWS आरक्षण म्हणजे काय..?

EWS म्हणजे Economically Weaker Sections अर्थात आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक.

EWS वर्गातील व्यक्तींना शिक्षण आणि नोकरीत दहा टक्के आरक्षण देण्याचा निर्णय केंद्र सरकारनं २०१९ मध्ये घेतला होता.

ज्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न आठ लाखांपेक्षा कमी आहे अशा व्यक्तींना EWS अंतर्गत शिक्षण आणि नोकरीत आरक्षण मिळू शकतं.

EWS आरक्षणासाठी पात्र व्यक्तींच्या कुटुंबाची शेती पाच एकरापेक्षा जास्त नसावी असं हा कायदा सांगतो.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com