<p><strong>मुंबई -</strong> </p><p>राज्य सरकारने आदिवासींसाठी असलेल्या खावटी योजनेच्या वस्तू खरेदीची निविदा प्रक्रिया रद्द केली आहे. </p>.<p> लाभार्थ्यांना थेट 4 हजार रुपये त्यांच्या बँक खात्यात करण्यात येणार आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तसे आदेशच दिले आहेत. करोना संकट काळात आदिवासी बांधवांना राज्य सरकारने खावटी योजनेतून लाभार्थी कुटुंबाला 2 हजार रुपये रोखीने तर ऊर्वरीत 2 हजार रुपयांची मदत अन्नधान्याच्या स्वरुपात देण्याची घोषणा केली होती. परंतु, या योजननेच्या अंमलबजावणीत दिरंगाई झाली होती. योजनेतील अनियमितता आणि लाभार्थ्यांचे झालेले स्थलांतर त्यामुळे जीवनावश्यक वस्तू त्यांच्यापर्यंत पोहोचू शकणार नसल्याने ही निविदा प्रक्रिया रद्द करण्याची मागणी पंडित यांनी केली होती.</p>