राज्य सरकारकडून वर्तमानपत्रांना दरवाढ, श्रेणीवाढ

८३३ वृत्तपत्रांना मिळणार दिलासा
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई :

राज्य शासनाने महाराष्ट्रातील सर्व वर्तमानपत्रांना दरवाढ व श्रेणीवाढ दिली असल्याची माहिती असोसिएशन स्मॉल अँड मीडियम न्यूज पेपर ऑफ इंडियाचे प्रदेशाध्यक्ष आप्पासाहेब पाटील यांनी दिली आहे. ठाकरे सरकारने घेतलेला हा महत्त्वाचा निर्णय आहे.

महाराष्ट्र शासनाच्या मान्यताप्राप्त यादीवरील ८३३ वृत्तपत्रांना जाहिरात दरवाढ व श्रेणीवाढ देऊन दिलासा दिला आहे. दरम्यान ४४ वृत्तपत्र शासनमान्य यादीवरून कमी करण्यात आली आहेत. कारण सदरची वृत्तपत्रे प्रसिद्ध होत नसल्यामुळे, आणि अनियमित आहेत अशा वर्तमानपत्रांना शासनमान्य यादीतून वगळण्यात आले आहेत. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने १३ ऑगस्ट रोजी शासन आदेश पारित करून ज्या वृत्तपत्रांना दरवाढ दिली आहे.

शासकीय संदेश प्रसार नियमावली २०१८ मधील तरतुदीनुसार महाराष्ट्रातील वृत्तपत्रांची तपासणी करण्यात आली होती. नवीन नियमावलीनुसार जे वर्तमानपत्र पात्र आहेत. अशा महाराष्ट्रातील दैनिक, साप्ताहिकांसह लघु व मध्यम वृत्तपत्रांनाही दरवाढ, श्रेणीवाढ देण्यात आलेली आहे. महाराष्ट्रातील प्रिंट मीडियासाठी असोसिएशन स्मॉल अॅन्ड मीडियम न्यूज पेपर ऑफ इंडिया ही संघटना सातत्याने वृत्तपत्रांचे प्रश्न सोडविण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न करीत असल्याने अखेर या प्रयत्नांना सकारात्मक यश आले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com