मुंबई l Mumbai

करोना महामारीच्या संकटामुळे गेल्या ९ महिन्यांपासून बंद असलेल्या उद्योग धंदे आता पूर्वपदावर येत आहे. हळूहळू करून सर्व उद्योग धंदे सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे.

आता पर्यटन स्थळावरील वॉटर पार्क, (Water park) जलक्रीडा आणि इनडोअर कार्यक्रमांना राज्य सरकारने परवानगी दिली आहे. वॉटर स्पोर्ट्स, नौका विहार, करमणूक उद्यानं आणि इनडोअर गेम्स सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे. सुरु करण्यास परवानगी दिली आहे. त्याचबरोबर कन्टेमेंट झोन बाहेरील पर्यटन स्थळे पुन्हा सुरु करण्यासही मुभा देण्यात आली आहे.

सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगडमधल्या जलक्रिडा व्यावसायिकांनी काही दिवसांपूर्वी राज्याचे बंदरे मंत्री अस्लम शेख यांची त्यांच्या मंत्रालयातील दालनात जाऊन भेट घेतली. यावेळी त्यांनी जलक्रीडा (Water Sport) व्यावसायिकांच्या व्यथा मांडत या व्यवसाय पुन्हा सुरु करण्याची मागणी केली होती. अस्लम शेख यांनी शिष्टमंडळास जलक्रीडेसाठी लवकरच आदर्श कार्यप्रणाली तयार करण्याचे व राज्य सरकारचा बंदर विभाग व पर्यटन विभाग यांच्या समन्वयातून जलक्रिडा व्यवसायाशी (Water Sport) निगडीत विविध परवानग्या मिळवण्याची प्रक्रिया सोपी व सुलभ करण्याचे आश्वासन दिले होते.

गेल्या काही दिवसांपासून करोना बाधितांची नियंत्रित येणारी संख्या लक्षात घेता नागरिकांची लॉकडाऊनच्या कडक नियमांतून सुटका करण्यात आली आहे. तसंच लवकरच लसीकरणालाही सुरुवात होईल, अशी आशा निर्माण झाली आहे. यापूर्वी देखील बंद असलेल्या सेवा-सुविधा पूर्ववत करण्यात आल्या होत्या. पुढील वर्षात सर्वसामान्यांसाठी लोकल सेवाही सुरु करण्याचा मानस असल्याचे संकेत सरकारकडून देण्यात आले आहेत.

दरम्यान, ब्रिटन आणि इतर काही देशांमध्ये करोना विषाणूचा नवीन प्रकार आढळून आला आहे. या दुसऱ्या प्रकारच्या करोना विषाणूचा प्रसार अतिशय वेगाने होत असल्याचे त्यांच्या निष्कर्षावरून स्पष्ट होत आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्यात सर्व प्रशासकीय यंत्रणांनी सावध राहतानाच चाचण्यांचे प्रमाण वाढवावे, मास्कचा वापर बंधनकारक करावा, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले. पुढचा धोका लक्षात घेऊन जागरुक राहण्याचे आवाहनही मुख्यमंत्री ठाकरे यांनी केले आहे.