राज्यात लसीकरणाचा साडेतीन कोटींचा टप्पा पार

राज्यात लसीकरणाचा साडेतीन कोटींचा टप्पा पार

मुंबई / Mumbai - राज्यातील करोना प्रतिबंधक लसीकरणाने (Covid-19 Vaccination) साडेतीन कोटींचा टप्पा पार केला आहे. अशी कामगिरी करणारे, महाराष्ट्र (Maharashtra) हे देशातले पहिले राज्य ठरले आहे. आरोग्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचीव डॉ. प्रदीप व्यास यांनी ही माहिती दिली.

राज्यात बुधवारी 3 हजार 636 लसीकरण सत्रांच्या माध्यमातून 6 लाख 35 हजार 390 लाभार्थ्यांचे लसीकरण झाले. राज्यात आतापर्यंत 3 कोटी 54 लाख 45 हजार 243 लाभार्थ्यांना कोविड प्रतिबंधक लशीची मात्रा देण्यात आली आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com