एमपीएससीची परीक्षा विभागीय केंद्रांवर
महाराष्ट्र

एमपीएससीची परीक्षा विभागीय केंद्रांवर

उमेदवारांना मोठा दिलासा

Dhananjay Shinde

Dhananjay Shinde

मुंबई | Mumbai -

करोना संकटामुळे येत्या 20 सप्टेंबर रोजी होणारी महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाची विविध पदांसाठीची भरती परीक्षा आता फक्त मुंबई आणि पुणे येथे न होता राज्यातील सर्व महसूल विभागीय केंद्रांवर घेतली जाणार आहे. या निर्णयामुळे या परीक्षेला बसलेल्या उमेदवारांना मोठा दिलासा मिळाला आहे. MPSC prelims exam 2020

विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी गुरुवारी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष सतिश गवई यांच्याशी परीक्षा उमेदवारांच्यावतीने चर्चा केली आणि करोना परिस्थितीमुळे फक्त मुंबई आणि पुणे येथे परीक्षा ठेवल्यास राज्याच्या अन्य भागातील स्पर्धा परिक्षेतील उमेदवारांना रेल्वे सेवा बंद असल्याने परीक्षास्थळी पोहचणे शक्य होणार नाही ही वस्तुस्थिती निदर्शनास आणत ही परीक्षा सर्व महसूल विभागीय केंद्रांवर घेण्यात यावी अशी सूचना केली.

अखेर येत्या 20 सप्टेंबर, 2020 रोजी होणारी ही परीक्षा मुंबई, पुणे यांसह राज्यातील सर्व महसूल विभागीय केंद्रांवर घेतली जावी ही सूचना महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने मान्य केली आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com