मुंबई | Mumbai

आज सकाळी 7 वाजणेच्या सुमारास ईडीचे (ED) पथक प्रताप सरनाईक यांच्या घर आणि कार्यालयात चौकशीसाठी पोहोचले. छापेमारी केल्यानंतर ईडीच्या पथकाने प्रताप सरनाईक यांचे पुत्र विहंग सरनाईक यांना ताब्यात घेतलं आहे.

तसेच, महत्वाची कागदपत्रेही ईडीने ताब्यात घेतली आहेत. जवळपास ४ तास चौकशी केल्यानंतर विहंग सरनाईक यांना ईडीच्या एका पथकाने ताब्यात घेतले आहे. त्यांना चौकशीसाठी मुंबईला नेण्यात आल्याचं सांगण्यात आलं आहे.

दरम्यान अन्वय नाईक आत्महत्या प्रकरण, अर्णब गोस्वामी आणि कंगना रनोट प्रकरणात प्रताप सरनाईक यांनी यांना आवाज उठवत विरोध केला होता. प्रताप सरनाईक यांचा आवाज दाबण्यासाठी तसेच त्यांची कोंडी करता यावी यासाठी ही कारवाई केल्याची चर्चा आहे. मात्र भाजपच्या प्रवक्त्यांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत.

शिवसेनेच्या इतरही काही ज्येष्ठ नेत्यांना ईडीची नोटीस मिळाल्याचे वृत्त आहे. एका वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार, ईडीने शिवसेनेच्या ज्या नेत्यांना नोटीस बजावली आहे त्यात शिवसेनेच्या अनेक ज्येष्ठ नेत्यांचा समावेश आहे. या नेत्यांची नावे ईडीने अद्याप जाहीर केली नाहीत. परंतू, सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तात हे नेते अत्यंत ज्येष्ठ असल्याचे म्हटले आहे.