Maharashtra Din : पंतप्रधान मोदींनी मराठीतून दिल्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा!

पंतप्रधान नरेंद्र मोदी
पंतप्रधान नरेंद्र मोदी

मुंबई | Mumbai

आज एक मे… राज्यभरात आज ६२ वा महाराष्ट्र दिन (Maharashtra Din) मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. अनेक ठिकाणी वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजनही करण्यात आले आहे.

मागील दोन वर्ष करोनाच्या (Corona) पार्श्वभूमीवर अगदी साध्या पद्धतीने हा खास दिन साजरा झाला होता. पण यंदा करोनाचे सावट कमी असल्याने नेहमीच्याच उत्साहात हा दिवस साजरा केला जात आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी
दहशतवाद्यांसह अंडरवर्ल्डचं कंबरडं मोडणाऱ्या 'सुपरकॉप'ची कहाणी मोठ्या पडद्यावर; रोहित शेट्टीची घोषणा

दरम्यान महाराष्ट्र दिनानिमित्त राष्ट्रपती रामनाथ कोविंद (President Ram Nath Kovind) यांच्यासह पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनीही महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मराठीतून () शुभेच्छा दिल्या आहे.

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी म्हटलं आहे की, 'राज्य स्थापना दिनानिमित्त महाराष्ट्रातील सर्व जनतेला शुभेच्छा. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांसारख्या महान महापुरुषांनी महाराष्ट्र आणि भारतासाठी आपलं योगदान देत समृद्ध केलं आहे. राष्ट्राच्या आर्थिक विकासात महाराष्ट्राचं योगदान महत्वाचं आहे.'

पंतप्रधान नरेंद्र मोदी
बॉलिवूड अभिनेत्री 'जॅकलिन फर्नांडीस'ला ED चा दणका; कोट्यवधींची संपत्ती जप्त

तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मराठीत ट्विट करत म्हंटल आहे की, 'महाराष्ट्रातील सर्व जनतेला महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. देशाच्या प्रगतीत या राज्याने अभूतपूर्व योगदान दिले आहे. इथल्या लोकांनी विविध क्षेत्रात आपले कर्तृत्व सिद्ध केले आहे. महाराष्ट्रातील जनतेच्या समृद्धीसाठी मी प्रार्थना करतो.'

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com