...तर कडक कारवाई, कायदा हातात घेऊ नका; पोलीस महासंचालकांचा इशारा

...तर कडक कारवाई, कायदा हातात घेऊ नका; पोलीस महासंचालकांचा इशारा

मुंबई | Mumbai

गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची बैठक घेतल्यानंतर राज्याचे पोलीस महासंचालक रजनीश सेठ (Rajneesh Seth) यांनी पत्रकार परिषद घेत या बैठकीची माहिती दिली.

गृहमंत्र्यांनी कायदा आणि सुव्यस्थेच्या दृष्टीने आढावा बैठक घेतली. महाराष्ट्र पोलीस दल कायदा सुव्यस्थेचा प्रश्न हाताळण्यास सक्षम आहेत. आमची पूर्ण तयारी आहे. कोणत्याही परिस्थितीत कायदा बिघडू नये यासाठी आम्ही सर्वांना सूचना केल्या आहेत. याआधी समाजकंठक, गुन्हेगार स्वरुपाच्या लोकांवर मोठ्या प्रमाणात प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे, अशी माहिती रजनीश सेठ यांनी दिली.

तसेच, राज्यात एसआरपीएफ आणि होमगार्ड संपूर्ण राज्यात तैनात केले आहे. १५ हजार नागरिकांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. संपूर्ण पोलीस दल रेडी मोडमध्ये आहे आणि जो कुणी कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण कऱण्याचा प्रयत्न करेल त्यावर योग्य ती कारवाई करण्यात येईल असंही पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांनी म्हटलं आहे.

राज ठाकरेंवर आजच कारवाई

राज ठाकरे यांच्यावर औरंगाबादमधील भाषणाचा स्थानिक पोलीस आयुक्तांनी अभ्यास केला असून या प्रकरणात काही सापडल्यास आजच कारवाई करणार असल्याचं पोलीस महासंचालकांनी स्पष्ट केलं आहे.

Related Stories

No stories found.