25 वर्‍हाडींतच म्हणा शुभमंगल सावधान!

संचारबंदीचे काऊंटडाऊन सुरू
25 वर्‍हाडींतच म्हणा शुभमंगल सावधान!

अहमदनगर (प्रतिनिधी) -

कोवीडचा प्रार्दुभाव अटोक्यात आणण्यासाठी राज्यशासनाने आज रात्री आठ वाजेपासून पुढील 15 दिवस राज्यात 144 कलम लागू करत संचारबंदीच लागू केली आहे.

अत्यावश्यक सेवा मात्र सुरूच राहणार आहे. दरम्यान लग्नासाठी पूर्वी असलेली 50 वर्‍हाडीची अट बदलून ती आता 25 इतकी करण्यात आली आहे. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी काल रात्री जनतेशी फेसबुक लाईव्ह द्वारे संवाद साधला.

त्यानंतर रात्रीच शासनाच्या गाईडलाईन्स जारी करण्यात आल्या. आज रात्रीपासून 1 मे रोजी सकाळापर्यंत संचारबंदीची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे. आता या संचारबंदीच्या काळात लग्न करणार असाल किंवा नियोजित लग्न असेल तर राज्यात आता लग्न समारंभांसाठी नवे निर्बंध लागू करण्यात आले आहेत.

नव्या नियमावलीनुसार, लग्न सोहळ्यांना केवळ 50 नाहीतर 25 जणांनाच उपस्थित राहण्याची परवानगी असणार आहे. तसेच लग्न सोहळ्याच्या नियोजनासाठी तुम्ही जर केटरिंग किंवा इव्हेंट कंपनीची मदत घेणार असाल तर त्या कर्मचार्‍यांची आरटीपीसीआर टेस्ट करणे बंधनकारक असणार आहे.

तसेच लग्नसोहळ्यांसाठी जारी करण्यात आलेल्या नियमांपैकी कोणत्याही नियमांचं जर उल्लंघन झालं तर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. आधी लग्नसोहळ्यांसाठी 50 जणांच्या उपस्थितीची मर्यादा होती. पण आता कोरोनाचा वाढत्या प्रादुर्भावामुळे केवळ 25 जणांच्या उपस्थितीच लग्नसोहळा उरकावा लागणार आहे.

रस्त्याकडेला असलेले खाद्य पदार्थ विक्रेत्यांना विक्रीची मुभा देण्यात आली. किराणा दुकान, डेअरी, मेडिकल, हॉस्पिटल, भाजीपाला, फळ विक्रेत्यांना सकाळी 7 पासून रात्री आठ वाजेपर्यंत विक्रीची परवानगी देण्यात आली आहे.

बिल्डरांच्या साईटसवरच मजुरांचा मुक्काम

बिल्डरांचे सुरू असलेल्या साईटस्वरील बांधकाम सुरू राहणार आहे. मात्र मजुरांची ने-आण करण्याला बंधने घातली आहेत. साईटस्वरच मजुरांच्या निवासाची सोय करणे बंधनकारक करण्यात आले आहे.

बार, रेस्टॉरंट, हॉटेलची पार्सल सेवा

बार, रेस्टॉरंट, हॉटेल पंधरा दिवस बंद राहणार आहेत. या काळात त्यांना पार्सल सुविधा देण्याची मुभा देण्यात आली आहे. मात्र पार्सल घेण्यासाठी स्वत:ला जाता येणार नाही. या तिन्ही अस्थापनेतील कामगारांना कोरोना लस घेतलेली पाहिजे, अशी अट शासनाने टाकली आहे.

ब्रेक द चैन!

आज रात्री 8 वाजल्यापासून निर्बंध

राज्यात 144 कलम चालू.

पुढचे 15 दिवस संचारबंदी.

अनावश्यक बाहेर फिरण्याला मनाई

घराबाहेर विनाकारण बाहेर पडू नये

आवश्यक सेवा वगळून इतर सेवा बंद

अत्यावश्यक सेवेचा टाईम सकाळी 7 ते रात्री 8

बस अत्यावश्यक कर्मचार्‍यांसाठी सुरु

जनावरांचे रुग्णालय सुरु

हॉटेल्स, रेस्टॉरंटमधून टेक अवे सुरू

रस्त्यावरच्या ठेलेवाल्यांनाही टेक अवेची घोषणा

प्रार्थना स्थळं, शाळा आणि कॉलेज, खाजगी कोचिंग क्लासेस, सलून, स्पा आणि ब्युटी पार्लर आजपासून 1 मे रोजी सकाळी 7 वाजेपर्यंत बंद

रेस्टॉरंट्समध्ये बसून खाता येणार नाही.

अत्यावश्यक सेवा वगळता इतर कार्यालयं बंद

सर्व सार्वजनिक ठिकाणं बंद

धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक सभांवर बंदी

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com