Dahi Handi 2021: यंदाही दहीहंडी नाही!, मुख्यमंत्र्यांचं गोविंदा पथकांना 'हे' आवाहन

मुख्यमंत्री, दहीहंडी उत्सव आयोजकांच्या बैठकीत निर्णय
Dahi Handi 2021: यंदाही दहीहंडी नाही!, मुख्यमंत्र्यांचं गोविंदा पथकांना 'हे' आवाहन

मुंबई | Mumbai

राज्यात करोनाच्या दुसऱ्या लाटेचा (Coronavirus second wave in maharashtra)) प्रादुर्भाव उतरणीला लागला आहे. त्यानुसार राज्यात अनेक निर्बंध शिथील करण्यात आले असले तरीही सणांवर अजूनही बंदीच आहे.

दरम्यान मुंबईसहीत महाराष्ट्रामध्ये दहीहंडी (Dahi Handi 2021) आयोजित करण्याला राज्य सरकारने परवानगी नाकारली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) आणि महाराष्ट्रातल्या गोविंदा पथकांच्या प्रतिनिधीसोबत (Dahi Handi Coordination Committee) घेतलेल्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे.

या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) म्हणाले की, 'जनतेच्या आरोग्याला प्राधान्य देऊन, त्यांचे प्राण वाचविण्यासाठी आपण सण-वार, उत्सव काही काळासाठी बाजूला ठेऊ, मानवता दाखवू आणि करोनाला (COVID19) पहिले हद्दपार करू असा संदेश महाराष्ट्राने जगाला द्यावा.' तसेच 'सणांसंबंधी आपल्या सर्वांच्या भावना सारख्याच आहेत. आपले सण आपण जपलेच पाहीजेत… पण आता प्रश्न आरोग्याचा आहे. याचा विचार करता आपल्याला आरोग्याचा विचारच प्राधान्यांना करावा लागेल, असं म्हणत एकप्रकारे दहीहंडी साजरा करण्यावर निर्बंध असतील किंबहुना दहीहंडीसाठी परवानगी नसेल, असे संकेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले.

दहीहंडी समन्वय समितीच्या काय होत्या मागण्या?

आम्हाला आमच्या जागेवरची मानाची दहीहंडी फोडण्यास परवानगी मिळावी.

दहीहंडी फोडताना मानवी मनोरे उभारण्यासाठी सर्व गोविदांचे दोन्ही लसीकरण पूर्ण करणे आवश्यक आहे. तशी तयारी गोविंदा पथकांनी केली आहे.

गोविंदा पथक हे दुसरीकडे कोठेही दहीहंडी फोडण्यासाठी जाणार नाहीत.

कोविड १९ संसर्गाची जाणिव ठेवुनच सुरक्षित दहीहंडी उत्सव आम्हाला आमच्या जागेवरच करण्याची परवानगी द्यावी.

दहीहंडी फोडताना कोणतीही गर्दी होणार नाही याची काळजी गोविंदा मंडळं घेतील.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com