चिपळूणमध्ये पावसाचे थैमान

चिपळूणमध्ये पावसाचे थैमान

हजारो नागरिक पाण्यात अडकले, बचावकार्य सुरू

रत्नागिरी / Ratnagiri - मुसळधार पावसामुळे चिपळूणमध्ये 2005 सारखी पूरस्थिती निर्माण झाली आहे. विशिष्ठी आणि शिव नदीने धोक्याची पातळी ओलांडल्याने शहरात पाणी शिरले आहे. त्यामळे नागरिक धास्तावले आहेत. अनेक सोसायटी, घरांमध्ये पाणी शिरल्याने हजारो नागरिक पाण्यात अडकले आहेत. या नागरिकांच्या बचावासाठी एनडीआरएफचे पथकाचे रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे.

रात्रभर झालेल्या पावसामुळं नद्यांना पूर आला आहे. तर, एसटी स्टँड, परशुराम नगर पसिरात पाणी सातत्याने वाढत आहे. अनेक सोसायट्यांमध्ये पाणी शिरल्यानं गाड्या पाण्याखाली गेल्या आहेत. तर, एसटी बस आगाराला तळ्याचं स्वरुप आलं आहे. याशिवाय अनेक नागरिकांच्या घरात पाणी शिरले असून अनेक जण घरात अडकले आहेत.

रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनीही बचावकार्य सुरू असल्याची माहिती दिली आहे. गंभीर स्थिती असलेल्या घटना स्थळी हेलिकॉप्टर मदत घेतली जात आहे. संपूर्ण परिस्थितीवर आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभाग सतत लक्ष ठेवून आहे, अशी माहिती विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे. तर, चिपळूणकरता एनडीआरच्या दोन टीम नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यासाठी वेगाने रेस्क्यू ऑपरेशन राबविण्यात येत असून कोस्टल गार्डच्या मदतीने बोटी सुद्धा उपलब्ध करण्यात आले आहे. फूड पॅकेट्स व इतर मेडिकल सहकार्य उपलब्ध करून देण्यात येत आहे, असंही त्यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, चिपळूणवासीय झोपेत असताना पहाटे 4 वाजल्यापासून शहर परिसरात पाणी भरण्यास सुरुवात झाली. अचानक पाण्यात वाढ झाली आणि संपूर्ण परिसर पाण्याखाली गेला. अनेक ठिकाणी लोक अडकले आहेत.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com