हाफकिनमधून कोवॅक्सिनचे उत्पादन : राज्याच्या ९४ कोटींच्या निधीस मान्यता

हाफकिनमधून कोवॅक्सिनचे उत्पादन : राज्याच्या ९४ कोटींच्या निधीस मान्यता

मुंबई

हाफकिन जीव औषध निर्माण महामंडळास कोविड लस प्रकल्प सुरू करण्यास मान्यता देण्यात आली. त्यासाठी १५४ कोटी खर्च येणार आहे.

Title Name
BREAKING : आरोग्यमंत्र्यांची घोषणा : राज्यात लॉकडाऊन वाढणार
हाफकिनमधून कोवॅक्सिनचे उत्पादन : राज्याच्या ९४ कोटींच्या निधीस मान्यता

केंद्र शासनाच्या विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालयाच्या जैव तंत्रज्ञान विभागाच्या सहाय्याने आणि मे.भारत बायोटेक इंटरनॅशनल लि., हैद्राबाद या कंपनीकडून कोवॅक्सिन लसीचे उत्पादन हाफकिनमध्ये करण्यात येणार आहे. मुंबई येथील जागेत रूपये १५४ कोटी भांडवली खर्चाच्या कोवॅक्सिन लस उत्पादनाचा हा प्रकल्प सुरू होईल. प्रकल्पाच्या उभारणीसाठी रूपये ९४ कोटी इतके अर्थसहाय्य राज्य शासनाच्या आकस्मिकता निधीतून खर्च करण्यात येईल. केंद्र शासनाने रूपये ६५ कोटी इतके अर्थसहाय्य मंजूर केले आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com