Maharashtra cabinet decision : आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत झाले 'हे' महत्वाचे निर्णय

Maharashtra cabinet decision : आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत झाले 'हे' महत्वाचे निर्णय
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेCourtesy : Facebook/Uddhav Thackeray

मुंबई | Mumbai

राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक पार पडली या बैठकीत महाविकास आघाडी सरकारने अनेक महत्वाचे निर्णय घेतले आहेत.

यात प्रामुख्याने आरोग्य विभागाच्या वैद्यकीय अधिकारी आणि वरीष्ठ अधिकारी यांचे सेवानिवृत्तीचे वय ६२ वर्षापर्यंत वाढविण्यास कार्योत्तर मान्यता देण्यात आली आहे. कोरोना संकटाच्या काळात राज्य सरकारने आरोग्य विभागाशी संबंधित हा महत्वाचा निर्णय घेतल्याचं पाहायला मिळत आहे.

महाविकास आघाडी सरकारच्या निर्णयानुसार सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अधिपत्याखालील आरोग्य सेवा आयुक्तालयातंर्गत महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा, गट-अ व राज्य कामगार विमा योजनेतील महाराष्ट्र वैद्यकीय विमा सेवा, गट-अ मधील वैद्यकीय अधिकारी व वरिष्ठ पदावरील अधिका-यांचे सेवानिवृत्तीचे वय ६२ वर्षे असणार आहे. त्याचबरोबर राज्यातील सार्वजनिक उपक्रमातील कर्मचाऱ्यांना ७ व्या वेतन आयोगाप्रमाणे सुधारीत वेतनश्रेणी देण्यासाठी निकष निश्चित करणार असल्याचं या बैठकीत ठरलं.

राज्याच्या सहसी पर्यटन धोरणाला मान्यता देण्याबाबतही आजच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला. तसंच राज्यातील पीक विमा परिस्थितीचा आणि राज्यातील करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केलेल्या उपाययोजनांचा आढावाही या बैठकीत घेण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री कार्यालयाकडून देण्यात आली आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com