बारावीच्या विद्यार्थ्यांचे बैठक क्रमांक उपलब्ध

बारावीच्या विद्यार्थ्यांचे बैठक क्रमांक उपलब्ध

पुणे (प्रतिनिधि) / pune – दहावीच्या निकालानंतर आता बारावीचा निकाल कधी लागणार याकडे विद्यार्थी आणि पालकांचे लक्ष लागून आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून उच्च माध्यमिक प्रमाणपत्र बारावी परीक्षा 2021 साठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांना त्यांचे बैठक क्रमांक उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

उच्च माध्यमिक प्रमाणपत्र म्हणजेच बारावी परीक्षा कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सामान्य परिस्थितीत रद्द करण्यात आली. त्यापूर्वी 2019 परीक्षेसाठी प्रवेश होणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना उच्च माध्यमिक शाळा कनिष्ठ महाविद्यालयामार्फत 3 एप्रिल रोजी ऑनलाइन प्रवेश पत्र देण्यात आले आहेत. त्यानुसार सर्व उच्च माध्यमिक शाळांनी तसेच कनिष्ठ महाविद्यालय यांनी सर्व विद्यार्थ्यांना त्यांचे बैठक क्रमांक अवगत करून दिले आहेत. काही विद्यार्थ्यांना त्यांची बैठक क्रमांक अवगत झाले नसल्यास अशा विद्यार्थ्यांना मंडळाच्या संकेतस्थळावर सदरची माहिती उपलब्ध करून दिली आहे, असे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून सांगण्यात आले आहे.

अशा प्रकारे पाहाल आपला बैठक क्रमांक

मंडळाच्या http://mh-hsc.ac.in/ अधिकृत संकेतस्थळावर जा…

संकेतस्थळ ओपन झाल्यानंतर तिथे आवश्यक असलेली माहिती म्हणजे तुमचा जिल्हा, तालुका सिलेक्ट करा.

खालील टॅबमध्ये आधी आडनाव नंतर तुमचे नाव मग वडिलांचे नाव भरा

इंटर केल्यानंतर तुमचा रोल नंबर तुम्हाला दिसेल

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com