
मुंबई | Mumbai
महाराष्ट्र शासनातर्फे देण्यात येणाऱ्या महाराष्ट्र भूषण पुरस्कार (Maharashtra Bhushan Awar) सोहळ्याला रविवारी गालबोट लागले. नवी मुंबईतल्या खारघरमध्ये (Kharghar) रविवारी दुपारी महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळा पार पडला. ज्येष्ठ निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं.
मात्र या सोहळ्यासाठी उपस्थित असलेल्या श्री सदस्यांना उष्माघात झाला. उष्माघाताने मृत्यू होणाऱ्यांचा आकडा वाढतच चालला आहे. उष्माघातामुळे आता आणखी एकाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे मृतांचा आखडा १२ वर पोहचला आहे. कल्याणमध्ये राहणाऱ्या श्री सदस्याचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कल्याणमध्ये राहणाऱ्या विनायक हळदणकर (५५ वर्षे) या श्री सदस्याने महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्याला उपस्थिती लावली होती. भर उन्हात बसल्यामुळे त्यांना देखील उष्माघात झाला. त्यांना नवी मुंबईच्या पालिका रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. पण सोमवारी सकाळी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.