ज्येष्ठ निरूपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना यंदाचा 'महाराष्ट्र भूषण' पुरस्कार

ज्येष्ठ निरूपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना यंदाचा 'महाराष्ट्र भूषण' पुरस्कार

मुंबई | Mumbai

ज्येष्ठ निरूपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी (Appasaheb Dharmadhikari) यांना यंदाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार (Maharashtra Bhushan Award 2022) जाहीर झाला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी ही घोषणा केली. ज्येष्ठ समाजसेवक आणि निरूपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना वर्ष २०२२ चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यात येणार असल्याचे आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले.

अध्यात्म, समाज प्रबोधन, सामाजिक कार्य, अंधश्रद्धा निर्मूलन यासाठी केलेल्या कार्याची दखल घेत राज्य सरकारनं पद्मश्री आप्पासाहेब धर्माधिकारी यांना 'महाराष्ट्र भूषण' पुरस्कार जाहीर केला आहे. काही वेळापूर्वीच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी अप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या रेवदंडा इथल्या त्यांच्या निवास्स्थानी जाऊन त्यांची भेट घेतली.

दासबोध आणि श्री सद्गुरू चरित्रच्या माध्यमातून समाज घडवण्याचं कार्य आप्पासाहेब धर्माधिकारी करत आहेत. त्यांचे वडील नानासाहेब धर्माधिकारी यांच्याकडून त्यांनी हा वारसा घेतला. श्रवण बैठकांच्या माध्यमातून अधात्म आणि समाज परिवर्तनाचं कार्य त्यांच्याकडून गेली आठ दशकं सुरू आहे.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com