सिगारेट-बिडीच्या सुट्या विक्रीवर बंदी

आदेश जारी
सिगारेट-बिडीच्या सुट्या विक्रीवर बंदी

मुंबई -

महाराष्ट्रात सिगारेट आणि बिडीच्या सुट्या विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. आरोग्य विभागाने

यासंदर्भातील आदेश लागू केले आहेत.

या आदेशानुसार, सिगारेट आणि बिडीच्या सुट्या विक्रीवर तात्काळ बंदी घालण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे आता पानटपरी, चहा-कॉफी नाश्ता केंद्र किंवा अन्य कुठल्याही दुकानात बिडी किंवा सिगारेट सुटी विकता येणार नाही. येथे सिगारेट आणि बिडीचे संपूर्ण पाकीट विकणे बंधनकारक राहणार आहे.

राज्यातील तरुणाई मोठ्या संख्येने व्यसनांकडे वळत असल्याचे विविध स्वयंसेवी संस्था आणि वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत व्यक्तींनी सरकारच्या निदर्शनास आणून दिले. यातील गांभीर्य लक्षात घेत सरकारने तातडीने उपरोक्त आदेश जारी केला आहे. यापूर्वी राज्य सरकारकडून शाळा आणि महाविद्यालयाच्या 100 मीटर परिसरात सिगारेट आणि तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीवर बंदी घालण्यात आली होती.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com