महाराष्ट्र ATS ची धरपकड सुरुच; आणखी एका संशयित दहशतवादी ताब्यात

महाराष्ट्र ATS ची धरपकड सुरुच; आणखी एका संशयित दहशतवादी ताब्यात

मुंबई | Mumbai

बॉम्बस्फोटाचा कट रचल्याच्या आरोपावरून महाराष्ट्र एटीएसने (Maharashtra ATS) एक मोठी कारवाई करत संशयित दहशतवाद्याला अटक (suspected terrorist arrest) केली आहे.

मोहम्मद इरफान रहमत अली शेख असे त्या संशयित दहशतवाद्यांचे नाव असून तो पेशाने लेडीज टेलर असल्याची माहिती मिळत आहे. त्याला मुंबईच्या वांद्रे येथील खेरवाडी भागातून अटक करण्यात आली आहे. गेल्या महिन्याभरात दहशतवाद्यांशी संबंधित मुंबईतील ही तिसरी अटक आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.

महाराष्ट्र एटीएसने बॉम्बस्फोटाचा कट (terror conspiracy case) रचल्याच्या आरोपावरून महाराष्ट्रातील नांदेड, पुणे, औरंगाबाद, नागपूर आणि ठाणे जिल्ह्यातून १० जणांना समन्स जावून चौकशीला बोलावले होते.

दरम्यान काही दिवसांपूर्वी दिल्ली पोलिसांनी अटक केलेल्या सहा दहशतवाद्यांपैकी एक दहशतवादी हा मुंबईत राहणारा होता. त्यानंतर आता महाराष्ट्र एटीएसने मुंबईतून आणखी एका संशयित दहशतवाद्याला अटक केली. त्यानंतर आता वांद्रे परिसरातून आणखी एका संशयित दहशतवाद्याला अटक केल्याने एकच खळबळ उडाली आहे.

Related Stories

No stories found.