हिवाळी अधिवेशन : राज्यात ५ महिन्यात 'इतक्या' शेतकऱ्यांनी केल्या आत्महत्या

हिवाळी अधिवेशन : राज्यात ५ महिन्यात 'इतक्या' शेतकऱ्यांनी केल्या आत्महत्या

मुंबई | Mumbai

विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन (Maharashtra assembly winter session) सध्या सुरू आहे. आज अधिवेशनाचा तिसरा दिवस आहे.

दरम्यान राज्यात गेल्या काही दिवसांतली शेतकरी आत्महत्यांची (Farmers Suicide) आकडेवारी विधानसभेत सादर करण्यात आली आहे. त्यानुसार जून २०२१ ते ऑक्टोबर २०२१ या कालावधीत तब्बल १०७८ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे.

या अधिवेशनात शेतकरी आत्महत्यांसंदर्भात विचारण्यात आलेल्या प्रश्नाला उत्तर देत असताना राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार (Minister Vijay Vadettiwar) यांनी माहिती दिली आहे. तसेच या आत्महत्यांपैकी ४९१ प्रकरणं जिल्हास्तरीय समितीने पात्र ठरवलं असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे. तसंच त्यांना आर्थिक मदतही दिल्याचंही ते म्हणाले आहेत.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com