लातूर -

अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाने लातूर जिल्ह्यातील दापक्याळ ग्रामपंचायतीवर विजय मिळवला

आहे. ‘आप’चे सात पैकी पाच उमेदवार निवडून आले आहेत.

आम आदमी पक्षाचे महाराष्ट्र युवा अध्यक्ष अजिंक्य शिंदे यांनी ट्विटरवर ही माहिती दिली आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांनीही याची दखल घेत विजयी उमेदवारांचं अभिनंदन केलं आहे. केजरीवाल यांनी खास यासाठी मराठीतून ट्विट केलं आहे.

विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन! जनतेने आपल्यावर दाखवलेल्या विश्वासाला सार्थ करा, जनतेची सेवा करा. पुढील कार्यास शुभेच्छा, असं ट्विट केजरीवाल यांनी केलं आहे.

लातूर जिल्ह्यात भाजपने सर्वाधिक जागांवर विजय मिळवला आहे. पण आम आदमी पक्षानं या जिल्ह्यात खातं उघडल्यानं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. आपचे लातूर जिल्हाध्यक्ष प्रताप भोसले यांच्या नेतृत्वाखाली दापक्याळ येथील ग्रामपंचायतीत आपने विजय मिळवला आहे.