Maharahstra Kesari 2023 : शिवराज राक्षे यंदाचा 'महाराष्ट्र केसरी'

महेंद्र गायकवाडला केलं चितपट
Maharahstra Kesari 2023 : शिवराज राक्षे यंदाचा 'महाराष्ट्र केसरी'

पुणे | Pune

पुण्यात रंगलेल्या 65व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत (Maharahstra Kesari 2023) नांदेडचा पैलवान शिवराज राक्षे (Shivraj Rakshe) याने विजय मिळवत महाराष्ट्र केसरी 2023 (Maharahstra Kesari 2023) होण्याचा मान मिळाला आहे. यावेळी महेंद्र गायकवाड (Mahendra Gaikwad) माती विभागातून आला होता, तर शिवराज राक्षे (Shivraj Rakshe) हा गादी विभागातून या अंतिम फेरीत पोहोचला होता. अंतिम सामन्यात शिवराजने सोलापूरच्या महेंद्र गायकवाड (Mahendra Gaikwad) याला काही मिनिटातंच थेट चितपट करत विजय मिळवला आहे.

महाराष्ट्र केसरी 2023 स्पर्धेच्या अंतिम सामन्यापूर्वी माती आणि गादी विभागातील फायनलच्या स्पर्धेत शिवराज आणि महेंद्र यांनी विजय मिळवत अंतिम फेरी गाठली होती. यावेळी आधी माती विभागातील अंतिम लढत झाली. ही अंतिम लढत अतिशय चुरशीची झाली. सोलापूरचा सिकंदर शेख (Sikandar Shaikh) आणि पुण्याचा महेंद्र गायकवाड (Mahendra Gaikwad) यांनी एकमेंकाना तोडीस तोड खेळ दाखवला. अखेरपर्यंत दोघेही एकमेंकावर भारी पडत होते. पण अखेर 6-4 अशा फरकाने महेंद्रने सिंकदरला मात देत फायनलमध्ये धडक दिली.

अंतिम फेरीत पोहचलेले दोन्ही मल्ल हे पुण्याच्या एकाच तालमीत तयार झालेले आहेत. वस्ताद काका पवार (Kaka Pawar) व गोविंद पवार (Govind Pawar) यांच्या कात्रजमधील आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुल तालमीतील हे कुस्तीपटू आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com