करोना काळात फुफ्फुसाचे आरोग्य व्यवस्थित आहे का?

घरबसल्या सहा मिनिटात चेक करा !
करोना काळात फुफ्फुसाचे आरोग्य व्यवस्थित आहे का?
करोना

मुंबई | Mumbai

सध्या कोरोनाचा काळात अधिकधिक काळजी घेणे आवश्यक आहे. वेळच्या वेळी जेवण, पाण्याचे प्रमाण यासर्व गोष्टी आवश्यक आहेत. त्याचबरोबर आपल्या फुफ्फुसांचे कार्य देखील चांगलं असणे आवश्यक आहे.

कारण कोविड झाल्यास फुफ्फुसावर परिणाम होण्याची शक्यता असते. त्यामुळे या काळात आपलं फुफ्फुसे व्यवस्थित कार्य करतात का? त्यांचे आरोग्य सुरक्षित आहे का? या साठी घरबसल्या सहा मिनिटात आपल्याला याची चाचणी घेता येईल. आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी याबाबत आरोग्य अधिकाऱ्यांना आवाहन केले आहे.

कोविड 19 च्या काळात आपल्या फुफ्फुसांचे आरोग्य सुरक्षित आहे याची परीक्षा कशी कराल.

यासाठी सहा मिनिटे वॉक टेस्ट सहा किंवा सहा मिनिटे चालणे ही घरगुती आणि सोपी पद्धत आहे. ही चाचणी रक्तातील ऑक्सिजनची लपलेली कमतरता जाणून घेण्यास मदत करते.

कोणी करावी ?

ताप, सर्दी, खोकला किंवा कोविड १९ ची लक्षणे असणाऱ्या व्यक्ती

घरगुती विलगीकरणात असणाऱ्या व्यक्ती

कुठे करावी?

ही चाचणी कुठल्याही कडक जमिनीवर, भूभागावर करावी.

ज्या जमिनीवर चालणार आहात त्यावर चढ उतार नसावेत, पायऱ्यांवर ही चाचणी केली जाऊ शकत नाही.

घरातल्या कडक फरशीवर करणे अधिक चांगले.

चालण्यासाठी जास्तीत जास्त रिकामी जागा असलेल्या ठिकाणी ही चाचणी करावी.

कशी करावी?

तुमच्या बोटाला पल्स ऑक्सिमिटर लावा, आणि त्यावर दिसणाऱ्या तुमच्या रक्तातील ऑक्सिजन पातळीची नोंद करा.

पल्स ऑक्सिमिटर बोटाला तसाच ठेऊन घरातल्या घरात स्टॉपवाच किंवा घड्याळ लावून सहा मिनिटे फिरा/ चला.

सहा मिनिटे सलग स्थिर गतीने चालून झाल्यानंतर तुमच्या रक्तातील ऑक्सिजन पातळीची पुन्हा नोंद करा.

असे असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्या?

रक्तातील ऑक्सिजन पातळी सहा मिनिटे चालल्यानंतर ९३ पेक्षा कमी होत असेल.

चालणे सुरू करण्यापूर्वी जी पातळी होती त्या पातळीपेक्षा ३ टक्क्यांपेक्षा अधिकणे कमी होत असेल .

सहा मिनिटे चालल्यानंतर तुम्हाला दम धाप लागत असेल.

तर तुम्हाला ऑक्सिजन कमी पडतो आहे, असा त्याचा अर्थ होतो. असे होत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

(सार्वजनिक आरोग्य विभाग, महाराष्ट्र राज्य )

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com