
मुंबई | Mumbai
महाराष्ट्रात भोंग्यावरून (Loudspeaker row) सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी सरकारने (Maharashtra govt) सर्वपक्षीय बैठक (all-party meeting) बोलावली आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक घेण्यात येणार आहे. सरकारमध्ये सहभागी असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस (NCP), शिवसेना (Shivsena) आणि काँग्रेससोबतच (Congress) भाजप (BJP) आणि मनसेलाही (MNS) निमंत्रित करण्यात आले आहे.
या बैठकीला जवळपास सर्वच पक्षांनी उपस्थित राहण्यास संमती दिली असली तरी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) या बैठकीला उपस्थित राहणार नाहीत. आतापर्यंत समोर आलेल्या माहितीनुसार, या बैठकीला भाजपक्षकडून राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) उपस्थित राहणार आहेत, तर मनसेकडून नांदगावकर (Bala Nandgoankar) आणि संदीप देशपांडे (Sandip Deshpande) या बैठकीला सहभागी होणार असल्याची माहिती आहे. याशिवाय अन्य काही लहान पक्षांचे नेतेही तेथे उपस्थित राहणार आहेत.
मशिदीवरील भोंगे उतरवा अन्यथा हनुमान चालिसा लावण्यात येईल, असा इशारा मनसेने राज्य सरकारला दिला आहे. या पार्श्वभूमीवर भोंग्याबाबत राज्य सरकारकडून सर्वच प्रार्थनास्थळांसाठी लवकरच मार्गदर्शक सूचना (Guidelines for loudspeakers) जाहीर करण्यात येणार आहे. मार्गदर्शक सूचना जाहीर करण्याआधी या सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे या बैठकीत भोंग्यांच्या प्रश्नावर तोडगा निघणार का हे पाहणं महत्वाचं असणार आहे.