मम्मी घरात बसून, पप्पा घरात बसून, पैसे कुठून देणार!

कंपनी कर्मचाऱ्यांना चिमुकल्याच उत्तर
मम्मी घरात बसून, पप्पा घरात बसून, पैसे कुठून देणार!

कोल्हापूर | Kolhapur

'मम्मी घरात बसून आहे, पप्पाच्या हाताला काम नाही, हप्ते कसे देणार' हे ऊत्तर आहे, कोल्हापूर येथील चिमुकल्याने.

दरम्यान अशा आशयाचा या चिमुकल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पृथ्वीराज पाटील अस या चिमुकल्याच नाव आहे. झालं असं की, पृथ्वीराज च्या आईवडिलांनी एका फायनान्स कंपनीकडून कर्ज घेतले होते. या कर्जाच्या हफ्ता ची विचारणा करिता कंपनी कर्मचारी त्याच्या घरी गेले.

यावेळी पृथ्वीराजने कर्मचाऱ्यांना उत्तर दिले की, लोकांचं काम बंद आहेत, मम्मी घरात बसून, पप्पा घरात बसून आहेत, कुणीकडून आणायचं पैसे' तुम्ही थांबा जरा, आम्हाला वेळ द्या ! त्यावर कंपनी कर्मचाऱ्याने विचारले की पैसे तर द्यावे लागतील. यावर चिमुकला म्हणाला की, काम तर लागुद्या , आम्ही समदे पैसे परत करतो..या उत्तरानंतर कंपनी कर्मचारीही वरमला..

इयत्ता दुसरीत शिकणारा हा चिमुरडा पण त्यालाही परिस्थिती ची जाण असल्याचे यावरून दिसून येते.

एकीकडे करोनाचा कहर दुसरीकडे रोजगार नाही, यामुळे अनेकांची कामे बुडाली. हातावर पोट असणाऱ्यांचे जगणं मुश्किल झालं आहे. अशातच कर्जाचे हप्ते कसे भरणार? या प्रश्नांवर चिमुकल्याने दिलेल उत्तर खरंच हृदय पिळवटून टाकणार आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com