...तर राज्यात पुन्हा लॉकडाऊन लावावा लागेल; मुख्यमंत्र्यांचा इशारा

...तर राज्यात पुन्हा लॉकडाऊन लावावा लागेल; मुख्यमंत्र्यांचा इशारा

मुंबई | Mumbai

राज्यात करोनाची दुसरी लाट (Coronavirus Second Wave) ओसरत असल्याने निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत.

मात्र तिसऱ्या लाटेचा धोका कायम आहे. त्यामुळेच मुंबईत (Mumbai) आज माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी थेट लॉकडाऊनचा इशारा दिला आहे. तसंच करोना नियमांचे पालन न केल्यास तिसरी लाट अपेक्षेपेक्षा आधीच येईल, असेही ते म्हणाले. आज कालिना येथे बाल कोविड सेंटरच्या उद्धाटन प्रसंगी ते बोलत होते.

मुख्यमंत्री म्हणाले की, 'अजूनही करोनाचं संकट टळलेलं नाही. ते आपल्याला टाळायचं आहे. आपण जर अशाच पद्धतीने गर्दी करत राहिलो, करोनाबाबतचे नियम पाळले नाही, तर करोनाची तिसरी लाट अपेक्षेपेक्षा आधी येईल. गेल्या वेळी आपल्याकडे असलेल्या ऑक्सिजनच्या साठ्यात विशेष काही वाढ झालेली नाही. त्यामुळे रुग्ण वाढले आणि असलेल्या साठ्यापर्यंत पोहोचलो, तर मात्र आपल्याला कदाचित लॉकडाऊन लावावा लागेल',असं त्यांनी म्हंटल आहे.

तसेच मुख्यमंत्र्यांनीही आज भाजपचा उल्लेख न करता टोला लगावला.सर्व राजकीय पक्ष,धार्मिक,सामाजिक कार्यक्रम आताच्या परीस्थीतीत करणे आपल्याला आरोग्याच्या दृष्टीने फार महागात पडू शकते.राजकीय आणि स्वत:च्या स्वार्थासाठी नागरीकांचा जिव धोक्‍यात घालू नये.असे नमुद करत नागरीकांनी कोणत्याही चिथावणीला आमिषाला बळी पडू नये असे आवाहनही त्यांनी केला.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com