पंढरपुरात लॉकडाऊन वाढवला
महाराष्ट्र

पंढरपुरात लॉकडाऊन वाढवला

करोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी निर्णय

Dhananjay Shinde

Dhananjay Shinde

पंढरपूर |Pandharpur -

करोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाने पंढरपुरात 7 ऑगस्ट ते 13 ऑगस्ट या कालावधीत शहर आणि लगतची गावे लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला आहे. lockdown extended in Pandharpur या सात दिवसांत करोनाची साखळी तोडण्यात यश आले नाही तर आणखी तीन दिवस लॉकडाऊन वाढू शकतो, अशी माहिती सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी जिल्हा पोलीस अधिक्षक मनोज पाटील, सोलापूरचे आयुक्त पी.शिवशंकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश वायचळ आदी उपस्थित होते.

पंढरपूर शहर आणि तालुक्यांत करोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 500पेक्षा अधिक झाली आहे. करोनाचा वाढता प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्यासाठी लॉकडाऊन वाढवण्यात यावा असा प्रस्ताव प्रशासनाकडून पाठवण्यात आला होता. मंगळवारी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी लॉकडाऊनबाबत अधिकृत घोषणा केली.

जिल्हाधिकार्‍यांनी सांगितले, सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात दिवसेंदिवस करोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. पंढरपुरातही करोना रुग्णांची संख्या वाढत असली तरी यावर मात करणार्‍यांची संख्या समाधानकारक आहे. मात्र असे असले तरी करोनाची ही साखळी तोडण्यासाठी सात दिवसांचा लॉकडाऊन करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. येत्या 7 तारखेच्या पहाटेपासून ते 13 ऑगस्टच्या मध्यरात्रीपर्यंत हा लॉकडाऊन असणार आहे. तसेच सात दिवसांच्या या लॉकडाऊन काळात चाचण्यांचे प्रमाणही वाढवण्यात येणार आहे. जर परिस्थिती आटोक्यात आली नाही तर आणखी तीन दिवस लॉकडाऊन वाढवला जाऊ शकतो, या लॉकडाऊन दरम्यान दुध, मेडिकल आणि रुग्णालय या अत्यावश्यक सेवा वगळता कोणालाही घराबाहेर बाहेर पडण्यास परवानगी नाही.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com