मुंबई -

केंद्र सरकारकडून महाराष्ट्राला करोना प्रतिबंधक लसीचे मागणीपेक्षा कमी डोस मिळाले आहेत असा पुनरुच्चार आरोग्यमंत्री

राजेश टोपे यांनी केला आहे. दरम्यान, लस वितरणात कोणत्याही राज्यासोबत भेदभाव केलेला नाही असे सांगत केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने यापूर्वीच स्पष्ट करत टोपे यांचा आरोप फेटाळला आहे.

आता पुन्हा राजेश टोपे यांनी मागणीपेक्षा कमी लसीचा पुरवठा केल्याचे म्हटले आहे. महाराष्ट्राला 17.50 लाख करोना प्रतिबंधक लसींची आवश्यकता आहे.

आठ लाख आरोग्य कर्मचार्यांनी लसीकरणासाठी कोविन अॅपवर रजिस्ट्रेशन केलं आहे. आम्हाला करोना प्रतिबंधक लसीचे 10 लाख डोस मिळाले. आम्हाला अजून साडेसात लाख लसींच्या डोसची आवश्यकता आहे असे राजेश टोपे म्हणाले आहेत.