लॉकडाऊन काळात ५०७ सायबर गुन्ह्यांची नोंद

२६२ जणांना अटक
सायबर पोलीस
सायबर पोलीस

मुंबई : लॉकडाऊनच्या काळात राज्यामध्ये समाजमाध्यमांचा गैरवापर करून आक्षेपार्ह पोस्टस केल्याप्रकरणी ५०७ विविध गुन्हे महाराष्ट्र सायबरने दाखल केले असून २६२ व्यक्तींना अटक करण्यात आली आहे, अशी माहिती महाराष्ट्र सायबरच्या विशेष पोलीस महानिरीक्षकांनी दिली.

राज्यातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये एकूण ५०७ गुन्ह्यांची नोंद कालपर्यंत झाली आहे.

आक्षेपार्ह संदेश, पोस्टर्स, व्हिडिओ, ट्विट पोस्टस, शेअर केल्याप्रकरणी प्लॅटफॉर्मनिहाय गुन्हे दाखल

■ व्हॉट्सॲप- १९६ गुन्हे

■ फेसबुक पोस्ट्स – २११ गुन्हे दाखल

■ टिकटॉक व्हिडिओ- २७ गुन्हे दाखल

■ ट्विटर – आक्षेपार्ह ट्विट – १० गुन्हे दाखल

■ इंस्टाग्राम – चुकीच्या पोस्ट- ४ गुन्हे

■ अन्य सोशल मीडिया (ऑडिओ क्लिप्स, युट्यूब) गैरवापर – ५९ गुन्हे दाखल

■ वरील सर्व गुन्ह्यांमध्ये आतापर्यंत २६२ आरोपींना अटक.

■ १०७ आक्षेपार्ह पोस्ट्स समाजमाध्यमांवरून हटविण्यात यश

धुळे जिल्ह्यात आझादनगर पोलीस स्टेशनमध्ये एका गुन्ह्याची नोंद

धुळे जिल्ह्यात नोंदणीकृत गुन्ह्यांची संख्या ५ वर गेली आहे.

■ सदर गुन्ह्यातील संशयिताने करोना महामारीच्या काळात राजकीय व धार्मिक टिपणीचा मजकूर असणाऱ्या आशयाचे विधान आपल्या फेसबुक प्रोफाईलवरून पोस्ट केले होते व त्यामुळे परिसरातील शांतता भंग होऊन, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकला असता.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com