
मुंबई | Mumbai
गानकोकिळा लता मंगेशकर (Lata Mangeshkar) करोनाची (Corona) लागण झाली आहे. त्यांच्यावर मुंबईतील ब्रीच कॅण्डी रुग्णालयात (Breach Candy Hospital) आयसीयूमध्ये (ICU) उपचार सुरु आहेत. तसेच लता मंगेशकर यांना न्यूमोनियादेखील (Pneumonia) झाला आहे....
त्यांच्या प्रकृतीत काल रात्रीच्या सुमारा अधिकच बिघाड झाल्याची अफवा पसरली होती. मात्र लतादीदींची प्रकृती स्थिर आहे. त्यांच्याबद्दल खोट्या बातम्या पसरवू नये, अशी विनंती लता मंगेशकर यांच्या प्रवक्त्याने केली आहे.
प्रवक्त्याने दिलेल्या निवदेनानुसार, लतादीदींची प्रकृती स्थिर असून त्यांच्याबाबत खोट्या बातम्या पसरवताना पाहून त्रास होतो. त्यामुळे कृपया लक्षात घ्या की लतादीदींची प्रकृती स्थिर आहे. त्यांच्यावर आयसीयूत सध्या उपचार सुरु आहेत. कृपया त्या घरी लवकर परततील अशी प्रार्थना करा, असे त्यांनी म्हटले आहे.