खंडाळा घाटात दरड कोसळली, मुंबईकडे येणारी वाहतूक खोळंबली

खंडाळा घाटात दरड कोसळली, मुंबईकडे येणारी वाहतूक खोळंबली

मुंबई | Mumbai

पुणे मुंबई लोहमार्गावर (Pune-Mumbai Railway) खंडाळा घाटातील (Khandala Ghat) नागनाथ ते पळसदरी दरम्यान पहाटेच्या सुमारास दरड (Landslide) कोसळल्याने पुणे मुंबई रेल्वे वाहतूक सेवा विस्कळीत झाली आहे.

पुण्याहून मुंबईच्या दिशेने जाणार्‍या रेल्वे गाड्या खंडाळा, लोणावळा व विविध रेल्वे स्थानकांवर थांबविण्यात आल्या आहेत. तर मुंबईहून पुण्याच्या दिशेने येणार्‍या रेल्वे गाड्या कर्जत रेल्वे स्थानकावर थांबविण्यात आल्या आहेत.

दरम्यान दरड हटवण्याचं काम पूर्ण झालं असून अद्याप रेल्वे एक तास उशिरानं धावत आहे. लवकरच रेल्वे सेवा पूर्ववत होणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com