Ganesh Chaturthi : 'लालबागच्या राजा'चे ऑनलाइन दर्शन कसे घ्याल?, जाणून घ्या

Ganesh Chaturthi : 'लालबागच्या राजा'चे ऑनलाइन दर्शन कसे घ्याल?, जाणून घ्या
लालबागचा राजा

मुंबई | Mumbai

महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्रीगणेश (Ganpati Bappa) यांचा १० दिवसांचा उत्सव म्हणजेच गणेशात्सवाला आजपासून सुरुवात झाला. गणेशोत्सवाच्या मुहूर्तावर संपूर्ण राज्यात धूम पाहायला मिळत आहे. वाजत-गाजत, गणपती बाप्पा मोरयाच्या (Ganpati Bappa Morya) निनादात, चैतन्यमयी वातावरणात गणरायाचे आगमन झाले.

यंदाचा गणेशोत्सवही करोनाच्या (COVID19) संकटातच पार पडत असून, गर्दी टाळण्यासाठी सरकारनं काही मार्गदर्शक तत्व गणेश मंडळासाठी जारी केली आहेत. या सूचनांचं पालन करत लालबागचा राजा गणेश मंडळानं भाविकांना घरबसल्या दर्शन घेता यावं म्हणून ऑनलाईन दर्शनाची सोय केली आहे. दरम्यान, यंदाच्यावर्षी तुम्हाला 'लालबागच्या राजा'चे ऑनलाइन दर्शन घेता येईल. (Lalbaugcha Raja online darshan)

लालबागचा राजाचे ॲानलाईन दर्शन (Lalbaugcha Raja online darshan) भाविकांसाठी शुक्रवार दि. १० सप्टेंबर २०२१ रोजी सकाळी ११:०० वाजल्यापासून ते रविवार दि. १९ सप्टेंबर २०२१ सकाळी ७:०० वाजेपर्यंत २४ तास चालु राहील.

सदर उत्सवाचे थेट प्रक्षेपण मंडळाच्या अधिकृत सोशल मीडिया साईटवर उपलब्ध असेल.

मंडळाचे अधिकृत वेबसाइट : www.lalbaugcharaja.com

मंडळाचे अधिकृत यूट्यूब चॅनल : https://youtu.be/Yrfsd3NsGdQ

मंडळाचे अधिकृत फेसबुक पेज : https://fb.me/e/1k0x7o4iC

मंडळाचे अधिकृत ट्विटर अकाऊंट : https://twitter.com/lalbaugcharaja

मंडळाचे अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंट: https://instagram.com/lalbaugcharaja

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com