लालबागचा राजा
लालबागचा राजा
महाराष्ट्र

लालबागचा राजा गणेशोत्सव मंडळ यावर्षीचा संपूर्ण खर्च मुख्यमंत्री सहायत्ता निधीस देणार

या वर्षीच्या गणेशोत्सवाचा संपूर्ण खर्च मुख्यमंत्री सहायत्ता निधीस देण्याचे मंडळाचे अध्यक्ष सुधीर साळवी यांनी जाहीर केले आहे.

Nilesh Jadhav

दरवर्षी उत्साहात साजरा होणारा गणेशोत्सव यावर्षी करोनाच्या पार्श्वभूीवर नियमांचे पालन करून साजरा करण्याचा निर्णय मंडळांनी घेतला आहे. जगभर प्रसिद्ध असणाऱ्या लालबागचा राजा सहायत्ता मंडळाने कौतुकास्पद निर्णय घेतला आहे.

या वर्षीच्या गणेशोत्सवाचा संपूर्ण खर्च मुख्यमंत्री सहायत्ता निधीस देण्याचे मंडळाचे अध्यक्ष सुधीर साळवी यांनी जाहीर केले आहे.

या वर्षीचा गणेशोत्सव २२ ऑगस्ट पासून सुरु होणार आहे. सध्या देशात करोनाचे सर्वाधिक रुग्ण (१,७४,७७१) महाराष्ट्रात आहे. त्यात मुंबई मध्ये सर्वाधिक रुग्ण आहेत. या पार्श्वभूमीवर करोनाचा प्रसार रोखण्यासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी गणेशोत्सव मंडळांची बैठक घेऊन काही निर्णय घेतले होते.

Deshdoot
www.deshdoot.com