करुणा धनंजय मुंडे सांगणार प्रेमकथा ; फेसबुक पोस्टमुळे खळबळ

करुणा धनंजय मुंडे सांगणार प्रेमकथा ; फेसबुक पोस्टमुळे खळबळ

मुंबई - राष्ट्रवादीचे नेते आणि सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या दुसर्‍या पत्नी करुणा शर्मा-मुंडे यांनी फेसबुकवर खळबळजनक घोषणा केली आहे. आपली प्रेमकथा पुस्तक रुपात प्रकाशित करणार असल्याचे त्यांनी फेसबुक पोस्टममध्ये आहे. त्यामुळे करुणा यांच्या वैयक्तिक जीवनातील कुठल्या गोष्टी वाचायला मिळणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले असून यानिमित्ताने धनंजय मुंडे यांचे खासगी आयुष्य पुन्हा एकदा चर्चेत येणार आहे.

करुणा धनंजय मुंडे यांनी फेसबुक पोस्ट करत म्हटले आहे, माझ्या जीवनावर आधारित सत्य प्रेम जीवनगाथा लवकर प्रकाशन प्रकाशित होण्याच्या मार्गावर आहे. त्याचे प्रकाशन लवकर केले जाणार आहे.

महत्त्वाचे म्हणजे करुणा यांच्या बहिणीने (रेणू शर्मा) धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचा आरोप केल्यानंतर धनंजय मुंडेंना खासगी आयुष्याबद्दल खुलासा करावा लागला होता. त्यावेळी धनंजय मुंडे यांनी सोशल मीडियातून खुलासा करत, तक्रार करणार्‍या रेणू शर्मा हिच्याशी आपला काहीएक संबंध नाही. तिची मोठी बहीण करुण शर्मा हिच्याशी परस्पर सहमतीने मी संबंध ठेवले होते. तिच्यापासून मला दोन मुलं आहेत, अशी कबुली दिली होती. तर विरोधकांनी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. मात्र तक्रार मागे घेतल्यानंतर हा वाद शमला होता. मात्र आता करुणा धनंजय मुंडे यांनी पुस्तक प्रकाशित करणार असल्याचे जाहीर केल्याने हा विषय पुन्हा चर्चेत आला आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com