कंगना रनौतची 'या' कनेक्शनबाबत चौकशी होणार

गृहमंत्री अनिल देशमुख यांचे आदेश
कंगना रनौतची 'या' कनेक्शनबाबत चौकशी होणार

मुंबई | Mumbai

कंगना रनौतची चौकशी करण्याचे आदेश गृहमंत्री अनिल देशमुख यांचे मुंबई पोलिसांना दिले आहेत.

महाराष्ट्र विधीमंडळामध्येदेखील आज कंगना रनौत (Kangana Ranaut ) प्रकरणावरून गदारोळ माजल्याचं चित्रं पहायला मिळालं आहे. विधानसभेमध्ये बोलताना राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत विरूद्ध मुंबई पोलिसांना चौकशीचे आदेश दिले आहेत.

दरम्यान शिवसेना आमदार प्रताप सरनाईक आणि सुनिल प्रभू यांनी केलेल्या लेखी तक्रारीची दखल घेत या कारवाईचे आदेश दिल्याचं स्पष्ट केलं आहे. काल प्रताप सरनाईकांनी तशी तक्रार विधानसभा अध्यक्षांकडेदेखील केली होती.

आता मुंबई पोलिसांनी देखील या प्रकरणामध्ये लक्ष घातले आहे. दरम्यान आज विधानसभेत कंगना विरूद्ध हक्कभंगाचा प्रस्ताव मांडण्यात आला होता.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com