कल्याण -

इंग्लंडहून कल्याण डोंबिवलीत आलेल्या 19 वर्षीय तरुणीचा करोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तिचा अहवाल जनुकीय रचनेच्या

तपासणीकरीता पुण्यातील एनआयव्ही प्रयोगशाळेत पाठविण्यात आला आहे अशी माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रतिभा पानपाटील यांनी दिली आहे. तरुणीची प्रकृती स्थिर असल्याची कल्याण डोंबिवली महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली. आता, पुण्याचा अहवाल काय येतो याकडे कल्याण डोंबिवलीकरांचे लक्ष लागले असून तो अहवाल जर पॉझिटीव्ह आला तर कल्याण डोंबिवलीकरांची चिंता वाढू शकते.

दरम्यान, इंग्लंडमध्ये करोनाचा एक नवा प्रकार आढळून आला आहे. हा करोनाचा नवीन स्ट्रेन जगभरात धुमाकूळ घालणार्या आधीच्या स्ट्रेनपेक्षा जास्त धोकादायक आहे.