शिर्डी संस्थानच्या सीईओपदी बगाटे

आयएएस अधिकार्‍यांच्या बदल्या
शिर्डी संस्थानच्या सीईओपदी बगाटे

शिर्डी |शहर प्रतिनिधी| Shirdi

साईबाबा संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर के. एच.बगाटे यांची नियुक्ती झाली असून आज मंगळवार दि.11 रोजी सकाळी दहा वाजता संस्थानची सुत्रे हाती घेणार असल्याची माहिती संस्थानचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र ठाकरे यांनी दिली.

साईबाबा संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी अरुण डोंगरे यांची निवड झाली होती. मात्र अवघ्या पाच महिन्यांच्या कालावधीतच त्यांची बदली झाल्याने आता साईबाबा संस्थानचे नवे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कोणाची वर्णी लागणार याकडे सर्व साईभक्त ग्रामस्थांचे लक्ष लागून होते.

रत्नागिरी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी के. एच. बगाटे यांची वर्णी लागली असून त्यांचे नियुक्तीपत्र संस्थानला प्राप्त झाले आहे.

करोना संकटात राज्य सरकारनं आणखी पाच आयएएस अधिकार्‍यांच्या बदल्या केल्या आहेत. यामध्ये मुंबई म्हाडाचे उपाध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद म्हैसकर, औरंगाबादचे जिल्हाधिकारी उदय चौधरी यांच्यासह पाच अधिकार्‍यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. K H Bagate CEO of the Shri Saibaba Sansthan Trust in Shirdi.

मिलिंद म्हैसकर यांची वन विभागाच्या प्रधान सचिवपदी बदली करण्यात आली आहे. अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाचे सचिव संजय खंदारे यांची महाजेनकोच्या अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

तर उदय चौधरी यांची मुख्य सचिवांच्या कार्यालयात उप सचिवपदी बदली करण्यात आली आहे. जलस्वराज्य प्रकल्पाचे प्रकल्प व्यवस्थापक ए.ए.गुल्हाणे यांची चंद्रपूरच्या जिल्हाधिकारीपदी बदली करण्यात आली आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com