मराठा आंदोलनादरम्यान आंदोलकांचा मृत्यू; एसटीकडून पाच वारसांना नोकरी

मराठा आंदोलनादरम्यान आंदोलकांचा मृत्यू; एसटीकडून पाच वारसांना नोकरी

नाशिक | Nashik

मराठा आंदोलनात मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या वारसांना नोकरी देण्याचा निर्णय माजी परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी जाहीर केला होता. त्यातील पाच जणांना राज्य परिवहन महामंडळाने नोकरीत सामावून घेतले आहे....

गेल्या पंचवार्षिकमध्ये मराठा आरक्षणाच्या मुद्यावरुन राज्यभर मूक मोर्चे झाले होते. आंदोलनात काही व्यक्तींचा मृत्यू झाला होता. त्यांच्या वारसांना एसटीच्या सेवेत सामावून घेण्याचा निर्णय तत्त्कालीन मंत्री दिवाकर रावते यांनी जाहीर केला होता.

त्यानुसार ३४ अर्ज महामंडळाकडे आले. त्यापैकी १३ जण पात्र ठरले. प्रत्यक्षात ५ वारसांना नोकरी मिळाली आहे. अर्जदारांचे शिक्षण कमी असल्याने त्यांना नोकरी देण्यास अडचणी निर्माण झाल्या. याशिवाय जिल्हाधिकर्‍यांमार्फत शिफारस नसल्यानेदेखील उमेदवार अपात्र ठरविण्यात आले आहे.

आता कोरोनाने मृत्यू झालेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या वारसांनादेखील नोकरी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. येत्या पावसाळी अधिवेशनात तारंकीत प्रश्‍न उपस्थित होणार आहे. त्याच्याही अर्जांची माहिती प्रशासनाने विभाग नियंत्रकांकडून मागविली आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com