जितेंद्र आव्हाड म्हणाले, ‘खरंच. हा मुख्यमंत्री खूप वाईट आहे’

जितेंद्र आव्हाड म्हणाले, ‘खरंच. हा मुख्यमंत्री खूप वाईट आहे’

मुंबई -

महाराष्ट्रात करोनाची स्थिती चिंताजनक होत चालली असून बेड्स, ऑक्सिजन आणि रेमडेसिवीर इंजेक्शनचा तूटवडा यामुळे एका बाजूला जनता त्रस्त झाली असताना विरोधी पक्ष भाजपसह अन्य पक्ष ठाकरे सरकारवर जोरदार टीका करत आहेत.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 14 एप्रिल रात्री 8 वाजेपासून पुढचे 15 दिवस राज्यात कडक निर्बंध लागू केले आहेत तसेच विविध घटकांसाठी आर्थिक पॅकेज जाहीर करण्यात केले आहे. या पॅकेजवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, प्रवीण दरेकर यांनी टीका केली आहे.

यावर राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी एका कवितेतून भाजपला सणसणीत चिमटा काढला आहे. ही कविता फेसबुकवर शेअर करण्यात आली असून जितेंद्र आव्हाड यांनी उपरोधिक शैलीत ही कविता लिहिली असून त्यातून त्यांनी भाजपची खिल्ली उडवली आहे.

‘खरंच. हा मुख्यमंत्री खूप वाईट आहे’

खरंच हा मुख्यमंत्री खूप वाईट आहे..!!

कधी थाळ्या वाजवायला

लावल्या नाही.

ना कधी मेणबत्या आणि दिवे

लावायला लावले .

निर्णय घेताना घेतले

विश्‍वासात.

विरोधकांचे त्यामुळेच

फावले..

शांत राहून तो लढत आहे

विरोधकांचे खरंच राईट आहे.

खरंच.हा मुख्यमंत्री खूप वाईट आहे.!!

मंदिर उघडा, बाजार उघडा

शाळा उघडा ते म्हणाले.

परीक्षा पुढे ढकलल्या तर

ते रस्त्यावर पुन्हा पुन्हा आले.

कोरोना वाढला तर ते आता

फक्त सरकारला दोषी ठरवत आहे.

विरोधकांचे खरंच राईट आहे.

खरंच.हा मुख्यमंत्री खूप वाईट आहे.!!

इमान तर विकले नाहीच

ना कोणत्या सरकारी कंपन्या विकल्या.

कोरोनाचे आकडे लपवले नाहीच

खोट्याने न कधी माना झुकल्या.

घरी पत्नी आणि मुलगा

आजारी असतांना तो मात्र लढत आहे.

विरोधकांचे खरंच राईट आहे.

खरंच.हा मुख्यमंत्री खूप वाईट आहे.!!

ना कुठे बडबोलेपणा

ना कशाचा बडेजाव..

आठ हजार कोटीचे

विमान नको.

ना कोणत्या प्रकरणात

घुमजाव..

जे करतोय ते प्रामाणिकपणे

तो करतो आहे.

विरोधकांचे खरंच राईट आहे.

खरंच.हा मुख्यमंत्री खूप वाईट आहे.!!

व्यापार्‍यांचे ऐकून घेतोय.

विद्यार्थ्यांचे ऐकून घेतोय.

गोरगरीब जनतेला

एकवेळ शिवभोजन मोफत देतोय.

निसर्ग चक्रीवादळ, कोरोना संकट

शेतकर्‍यांच्या अडचणी

साठी तो शांततेत लढतो आहे ..

विरोधकांचे खरंच राईट आहे.

खरंच.हा मुख्यमंत्री खूप वाईट आहे.!!

ना क्लीन चिट देता आली.

ना खोटी आकडे वारी देता आली.

निवडणूक काळात तर कधी

ना अशक्य घोषणा त्याला करता आली.

जे होण्यासारखे आहे तेच तो करतोय.

विरोधकांचे खरंच राईट आहे.

खरंच.हा मुख्यमंत्री खूप वाईट आहे.!!

महाराष्ट्राचे मीठ खाऊन

निधी पंतप्रधान निधीला ते देताय.

उठसूठ, सकाळ संध्याकाळ

ते टीका सरकार वर करताय.

तो मात्र टिकेला उत्तर न देता

सर्वसामान्यांसाठी झटत आहे.

विरोधकांचे खरंच राईट आहे.

खरंच.हा मुख्यमंत्री खूप वाईट आहे.!!

- डॉ. जितेंद्र आव्हाड

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com