महिलांच्या मदतीसाठी पोलीसदादांची हेल्पलाईन
महाराष्ट्र

महिलांच्या मदतीसाठी पोलीसदादांची हेल्पलाईन

Balvant Gaikwad

Balvant Gaikwad

जळगाव  – 

शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थिनींसह अन्य तरुणी व महिलांच्या सुरक्षेसाठी पोलीस दलातर्फे हेल्पलाइन सुरू करण्यात आली आहे. मोबाइल क्रमांक  9860501091) व जिल्ह्यातील नागरिकांकरिता आपत्कालीन, तत्काळ सेवेकरिता मोबाइल क्रमांक  8956715100  व व्हाट्सअप क्रमांक  9422210701, पोलीस नियंत्रण कक्ष (जळगाव)येथे कार्यान्वित आहेत.

विद्यार्थिनी, महिलांच्या सुरक्षिततेसाठी तसेच त्यांना तत्काळ पोलीस मदत मिळावी, म्हणून जिल्ह्यात महिला पोलिसांचे निर्भया पथक , दामिनी पथक कार्यान्वित आहेत. या पथकासाठी स्वतंत्र वाहन असून त्यात वाहनचालक, पोलीस अधिकारी व कर्मचारीही महिलाच आहेत.

शहरातील शाळा, महाविद्यालय, सार्वजनिक ठिकाणी हे पथक सकाळी 9 ते रात्री 9 दरम्यान  गस्त घालत असतात. पोलिसांकडे विद्यार्थिनी, तरुणी, महिलांच्या तक्रारी आल्यास तातडीने घटनास्थळी पोहचून मदत केली जाते. पोलीस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले यांच्या संकल्पनेतून पोलीस नियंत्रण कक्ष जळगाव येथे  हेल्पलाइन मोबाइल क्रमांकाची सुविधा  कार्यान्वित केली.

मोबाइल क्रमांक 9860501091 विद्यार्थिनींसह  महिलांच्या सुरक्षिततेसाठी तसेच त्यांना तत्काळ मदतीसाठी सुविधा आहे. मोबाइल क्रमांक 8956715100 जिल्ह्यातील नागरिकांकरिता आपत्कालीन, तात्काळ सेवेकरिता मोबाइल क्रमांक 9860501091 जिल्ह्यातील नागरिकांकरिता आपत्कालीन सेवेसाठी ही सोय आहे.

प्रत्येक पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी हे त्या- त्या पोलीस ठाण्यांतर्गत शाळा, महाविद्यालय यांना दररोज भेट देऊन  प्राचार्य, मुख्याध्यापक, विद्यार्थी-विद्यार्थिनी यांचे समवेत सुरक्षिततेबाबत चर्चा करणार आहेत.

शाळा व महाविद्यालयात घडणार्‍या विविध गुन्हेगारी घटना ( रॅगिंग , अंमली पदार्थ सेवन , सायबर गुन्हे , मुलींची छेडखानी आदी ) वर वेळेत नियंत्रण मिळवण्यासाठी पोलीस व विद्यार्थी नाते तयार करण्यासाठी पोलीस स्टेशन स्तरावर  पोलीस काका, पोलीस दीदी ही योजना राबविली आहे.

वेगळ्या कंपन्या, आयटी हब  व महत्त्वाच्या ठिकाणी जिथे रात्री उशिरापर्यंत महिला काम करतात, अशा महिलांना सुरक्षिततेची भावना प्रदान करण्यासाठी  र्इीववू उेि  संकल्पना पोलीस स्टेशन स्तरावर राबविली आहे.

Deshdoot Digital Dhamaka | देशदूत डिजिटल धमाका
www.deshdoot.com