आईने पैसे काढले तेवढ्यातच,चिमुरड्याने घेतली खिडकीतून उडी

आईने पैसे काढले तेवढ्यातच,चिमुरड्याने घेतली खिडकीतून उडी

आपल्या साडेतीन वर्षाच्या चिमूकल्यासोबत रेल्वेने प्रवास करणार्‍या आईकडे बाळाने फु्रटी घेण्याचा हट्ट केला. पोटच्या गोळ्याचा बालहट्ट पुरविण्यासाठी पर्समधून पैसे काढण्यासाठी आई जागेवरुन उठताच चिमुकल्याने धावत्या रेल्वेच्या आपातकालीन खिडकीतून उडी मारल्याची घटना शुक्रवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास भादली रेल्वेस्थानकानजीक घडली.

दरम्यान, या घटनेत साडेतीन वर्षाचा चिमुकला विनायक शिवकुमार गुप्ता (रा.बोरविली, मुबंई) हा गंभीर जखमी झाला आहे. त्याला पुढील उपचारासाठी मुंबई येथे हलविण्यात आले आहे. बोरीवली येथील पिंकी गुप्ता यांच्या भावाचा 16 फेबु्रवारी रोजी उत्तरप्रदेशातील कटहरी हिराकत जि.जौनपूर येथे लग्नसमारंभ होता. या लग्नसमारंभासाठी पिंकी या चिमुकला विनायक याच्यासह गेल्या होत्या. लग्नसोहळा आटोपून भाऊ सुरज गुप्ता याच्यासोबत त्या पुन्हा बोरीवलीकडे जाण्यासाठी मंडू आहीह- छत्रपती लोकमान्य टर्मीनल या एक्स्प्रेसनेे परतीचा प्रवास करी असताना आपातकालीन खिडकीजवळ बसल्या.

रेल्वे गाडीने भुसावळ स्टेशन सोडले. यादरम्यान गाडीत विनायकने गाडीत फ्रुटी विकायला आलेली पाहुन फ्रुटी घेूऊन देण्याचा हट्ट आईकडे धरला. आपल्या बाळाचा बालहट्ट पुरविण्यसाठी आईची ममता जागे झाली. त्या विनायकला आपातकालीन खिडकीजवळ उभा सोडून पर्समधून पैसे काढत असतांनाच उघड्या आपातकालीन खिडकीतून विनायक बाहेर पडला. विनायक बाहेर पडल्याचे लक्षात येताच पिंकी यांनी आरडाओरड करत एकच हंबरडा फोडला. सोबतच्या प्रवाशांनी तत्काळ चैन पुलींग करुन गाडी थांबवली. पिंकी भाऊ सुरजसोबत गाडीखाली उतरल्या. विनायक पडल्या दिशेने धावत सुटल्या. पडल्यावर जोरदार मार बसल्याने विनायक बेशुध्द पडला होता. त्याला उचलून त्या पुन्हा रेल्वेत बसल्या. जळगाव स्थानकावर रेल्वे पोहचण्यापूर्वी स्टेशन मास्तर यांनी लोहमार्ग पोलिसांना खबर दिली होती.

त्यानुसार गाडी रेल्वेस्थानकावर पोहचताच लोहमार्ग पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार राकेश पांण्डेय, पोलीस शिपाई अजय मून यांनी जखमी बालकास रुग्णवाहिकेतून जिल्हा रुग्णालयात हलविले. या घटनेत जखमी विनायकच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून उजवा हात मोडला आहे. त्याच्यावर प्राथमिक उपचार तसेच सिटीस्कॅन तपासणी करण्यात आली. यात मेंदूत रक्तश्राव झाला असल्याचे निष्पन्न झाले.

देवदुतासारखे धावून आलेले लोहमार्ग पोलीस राकेश पाण्डेय यांनी जखमी विनायकचे वडील शिवकुमार गुप्ता यांचेशी संपर्क करुन रुग्णवाहिका करुन देत जखमी विनायकला मुंबईकडे रवाना केले. याप्रकरणी लोहमार्ग पोलिसात नोंद करण्यात आली आहे.

चिमुरड्यांची काळजी घ्या

रेल्वेने वा अन्य कोणत्याही वाहनाने प्रवास करताना आपल्या चिमुकल्यांचा बालहट्ट पुर्ण करण्याच्या नादात अनेकदा पालक मोठा बेजबाबदारपणा करीत असतात. शहरात तर सायंकाळच्या वेळी सनरुपच्या खिडकीतून सुसाट कारमधून डोकावणारी बालके आपण बघत असतो. मात्र, भादली रेल्वे स्थानकादरम्यान धावत्या रेल्वेतून विनायक पडल्याची घटना अशा पालकांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारी आहे. बालहट्ट पुरविण्याच्या नादात आपल्या पोटच्या गोळ्याचा डोळ्यासमोर होणारा अपघात पाहण्याची घटना कोणत्याही दुदैवी पालकांच्या आयुष्यात येवू नये, यासाठी खबरदारी नक्की घ्या!

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com