आयटी इंजिनिअरची मद्यधुंद अवस्थेतच स्वत:च्या डोक्यात गोळी झाडून आत्महत्या ?

आयटी इंजिनिअरची मद्यधुंद अवस्थेतच स्वत:च्या डोक्यात गोळी झाडून आत्महत्या ?

पुणे |प्रतिनिधी|Pune

घरामध्ये मित्रांसोबत पार्टी सुरू असताना आयटी इंजिनिअरने मद्यधुंद अवस्थेतच स्वत:च्या डोक्यात गोळी झाडून घेण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. दरम्यान, पार्टीत सोबत असलेले मित्र घटनास्थळावरून पसार झाल्याने ही आत्महत्या आहे की हत्या याबाबत पोलिस साशंक असून त्यादृष्टीने पोलिस तपास करत आहेत. तीन दिवसांपूर्वी हा प्रकार घडला आहे. या घटनेने खळबळ उडाली आहे.

गणेश यशवंत तारळेकर (वय ४७) असे आत्महत्या केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गणेश हे कोंढवा बुद्रुक येथील एका उच्चभ्रू सोसायटीत राहण्यास आहेत. त्यांचा विवाह झालेला असून, त्यांना १४ वर्षांचा मूलगा आहे. ते आयटी इंजिनिअर होते. त्यांना १६ वर्षांपूर्वी विवाह झालेला आहे. त्यांची पत्नी सध्या माहेरी आहे.

दरम्यान, तीन दिवसांपूर्वी ते मित्रांसोबत त्यांच्याच घरी पार्टी करत होते. यादरम्यान पार्टी सुरू असतानाच अचानक त्यानी डोक्यात गोळी झाडून घेतली, असे त्याचे मित्र आता सांगत आहेत. गोळी झाडून घेतल्यानंतर ते दोन मित्र घटनास्थळावरून पसार झाले. पोलिसांना हा प्रकार कळताच कोंढवा पोलिसांनी धाव घेतली. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला आहे. त्यातून काही खुलासा होता का हे पाहिले जात आहे. दरम्यान या दोन मित्राकडे चौकशी सुरू असल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. त्याने नेमकी गोळी झाडून आत्महत्या केली आहे का की काही घातपात घडला आहे, हे स्पष्ट सांगता येत नसून, त्याबाबत तपास सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे.

Related Stories

No stories found.