
मुंबई | Mumbai
इर्शाळवाडीच्या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरले होते. या घटनेने इर्शाळवाडीवर दुःखाचे डोंगर कोसळले आहे. अशा वेळी सरकारने मदतीचा हात पुढे करत येथील रहिवाशांसाठी खालपुर चौक या भागात एक गाव उभे केले आहे आणि या रहिवाशांना अन्न, वस्त्र आणि निवारा या सर्व गोष्टी देण्यात आल्या आहेत. यानंतर आज स्वातंत्र्य दिनानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या ठिकाणाची पाहणी केली आणि नागरिकांशी संवाद साधला.
येत्या सहा महिन्यात इर्शालवाडीतील लोकांना त्यांच्या हक्काची घरे (Rehbilitation) देणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. दुर्घटनाग्रस्तांसाठी खालापूर भागातील चौक या ठिकाणी तात्पुरता निवारा केंद्राची उभारणी करण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांनीया निवाराकेंद्राची पाहाणी केली. इरसालवाडीतल्या ४२ कुटुंबियांच्या घराचा प्रश्न तर सोडवणारच, त्याच बरोबर त्यांचा रोजगार, शिक्षण विधवा महिलांचा आणि २२ अनाथ मुलांचा प्रश्न ही मार्गी लावला असून मी शेवट पर्यंत तुम्हच्या बरोबर आहे. तुम्हला वाऱ्यावर सोडणार नाही असा शब्दच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी इर्शालवाडी च्या लोकांना दिला.
इर्शाळवाडी दुर्घटनेनंतर सरकार तेथील ग्रामस्थांच्या पाठीशी उभे राहिले आहे. सरकारकडून इर्शाळवाडी ग्रामस्थांना अन्न वस्त्र आणि निवारा या सर्व सुविधा देण्यात आल्या आहेत. यामध्ये सकाळ, दुपार आणि संध्याकाळ असे तीन वेळेला २०० जणांचं जेवण, वैद्यकीय सुविधा, लहान मुलांसाठी नर्सरी, खेळण्यासाठी मैदान, २४ तास गरम आणि थंड पाणी, शौचालय, घनकचरा व्यवस्थापन, अशा सोयी सुविधा ग्रामस्थांना पुरवण्यात आल्या आहेत. तसेच याठिकाणी लक्ष ठेवण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरेही बसवण्यात आले आहेत.