आयपीएस विश्वास नांगरे पाटील चौकशीच्या फेऱ्यात

आयपीएस विश्वास नांगरे पाटील चौकशीच्या फेऱ्यात

पुणे | Pune

आयपीएस अधिकारी परमबीर सिंग (Parambir Singh) आणि रश्मी शुक्ला (Rashmi Shukla) यांना भीमा कोरेगाव चौकशी आयोगाकडून (Bhima Koregaon Inquiry Commission) समन्स (Summons) बजावण्याचे आदेश देण्यात आले होते...

वकील ॲड. आशिष सातपुते (Ashish Satpute) यांनी याबाबत अर्ज केला होता. भीमा कोरेगाव हिंसाचार घडला. त्यावेळी परमबीर सिंग अतिरिक्त पोलीस महासंचालक पदावर होते. तर रश्मी शुक्ला पुणे पोलीस आयुक्त पदावर कार्यरत होत्या, असे सातपुते यांनी म्हटले होते.

आता तत्कालीन कोल्हापूर परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील (Vishwas Nangre Patil) यांनादेखील चौकशीला बोलविण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे. रश्मी शुक्ला यांची चौकशी आयोगासमोर शुक्रवारी ६ तास साक्ष नोंदवण्यात आली. त्यांनी आयोगासमोर पुराव्यांचे प्रतिज्ञापत्रदेखील सादर केले. रश्मी शुक्ला यांनी चौकशीला पूर्ण सहकार्य केल्याची माहिती सरकारी वकील ॲड. शिशिर हिरे (Shishir Hire) यांनी दिली.

आयपीएस विश्वास नांगरे पाटील चौकशीच्या फेऱ्यात
जिल्हा बँकेने ओढून आणलेल्या 'इतक्या' वाहनांचा झाला लिलाव; पुढील लिलाव 'या' तारखेला

चौकशी आयोगाचे वकील ॲड. आशिष सातपुते यांनी नांगरे पाटलांना चौकशीसाठी साक्ष नोंदवण्यास बोलवण्यासाठी आयोगासमोर अर्ज दाखल केला. कोरेगाव भीमा दंगल घटनेच्या वेळी विश्वास नांगरे पाटील तत्कालीन कोल्हापूर परिक्षेत्र विभागाचे पोलीस महानिरीक्षक म्‍हणून कार्यरत होते. त्यामुळे, याप्रकरणी त्यांची साक्ष महत्त्वाची असल्याने त्यांनादेखील चौकशीसाठी बोलविण्यात येणार आहे.

आयपीएस विश्वास नांगरे पाटील चौकशीच्या फेऱ्यात
ज्येष्ठ कीर्तनकार बंडातात्या कराडकर पोलिसांच्या ताब्यात

यापूर्वी सातपुते यांचा अर्ज मंजूर करताना आयोगाचे अध्यक्ष माजी न्यायमूर्ती जे. एन. पटेल यांनी परमबीर आणि रश्मी शुक्ला यांना समन्स जारी करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार, रश्मी शुक्ला यांची चौकशी करण्यात आली. आता विश्वास नांगरे पाटील यांची चौकशी होणार आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com