
मुंबई | Mumbai
आज जागतिक महिला दिन. या दिवशी जगभरात स्त्रीशक्तीचा जागर केला जातो. चौकटी भेदून बाहेर पडलेल्या आणि विविध क्षेत्रात विक्रमी कामगिरी करणाऱ्या महिलांचा आज आवर्जून गौरव केला जातो.
स्त्री जातीचा संघर्ष कमी होऊन पुरुष समानता यावी यासाठी अनेक जन आजही प्रयत्न करत आहेत, त्यासाठीच मोलाचा मानला जाणारा आजचा दिवस. अशात एका महिलेने केलेल्या कामाचा चकित करणारा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. तुला येणार नाही, तु मुलगी आहेस... असं बोलणाऱ्यांच या महिलेने तोंडच बंद केलं आहे.
जागतिक महिला दिनामिमित्त MSEDCL ने एका लाईनवुमनचा व्हिडिओ शेअर केला आहे. यात ही महिला लाईटच्या खांबावर चढताना दिसत आहे. या पोस्टवर अनेक यूजर्संनी प्रतिक्रिया नोंदवल्या असून यातील अनेकांनी या महिलेचे कौतुक केले आहे. सध्या सोशल मीडियावर हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होतं आहे.